Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबी धरणाचे काम सुरू; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

बिबी : धरणाच्या कामास नारळ फोडून शुभारंभ करताना ग्रामस्थ. (छाया : संजय कांबळे) पाटण / प्रतिनिधी : 2-3 दिवसांपूर्वी मंत्रालय, मुंबई येथे पाटण तालुक

नवीन मक्याचे वाण देते १००-१०५ दिवसांत बंपर उत्पादन
महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा : दादाजी भुसे

पाटण / प्रतिनिधी : 2-3 दिवसांपूर्वी मंत्रालय, मुंबई येथे पाटण तालुक्यातील प्रलंबित व अपूर्ण धरणांच्या कामांसंदर्भात सत्यजीतसिंह पाटणकर व शेतकरी यांच्या सोबत मंत्री जयंत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीनंतर लगेचच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बिबी धरणाच्या अपुर्ण असणार्‍या कामास सुरुवात झाली. बिबी गावातील व विभागातील ग्रामस्थांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बिबी धरणाच्या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
पाटण तालुक्यातील धरणांची अपुरी व प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील, असे आश्‍वासन ना. जयंत पाटील यांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले होते. पाटण तालुक्यातील अनेक धरणांची कामे निधी अभावी आणि इतर तांत्रिक बाबींमुळे अपुरी व प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांना पाणी टंचाई व शेतीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांच्या संदर्भात ना. जयंत पाटील यांनी मंत्रालय येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीत सत्यजीतसिंह पाटणकर यांनी शेतकर्‍यांची कैफियत मांडली. त्यानुसार सबंधित धरणांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सबंधित विभागांना दिले. यामुळे बिबी धरणाच्या अपुर्ण असणार्‍या कामास पाढव्याच्या मुहूर्तावर नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावेळी पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, जि. प. सदस्य बापूराव जाधव, दूध संघाचे संचालक विजय शिंदे, संदीप पाटील, आप्पा देसाई, व्ही. के. सपकाळ, नयन पाटणकर, आनंदा संकपाळ, हणमंत शिंदे, सुनील शिंदे यांच्यासह केरा विभागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते.

COMMENTS