केंद्राकडून राज्याला पर्याप्त प्रमाणात कोरोना लस उपल्बध होत नाही : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Homeमहाराष्ट्रसातारा

केंद्राकडून राज्याला पर्याप्त प्रमाणात कोरोना लस उपल्बध होत नाही : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून देखील केंद्राकडून राज्याला पर्याप्त प्रमाणात लस उपल्बध होत नाही, ही चिंतेची बाब आहे. सध्या दुसर्‍या लाटेच फटका बसल्याच चित्र दिसतंय.

एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक
वळणमध्ये शाळेनेच दिला गणवेशाला नकार
बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा

कराड / प्रतिनिधी : राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून देखील केंद्राकडून राज्याला पर्याप्त प्रमाणात लस उपल्बध होत नाही, ही चिंतेची बाब आहे. सध्या दुसर्‍या लाटेच फटका बसल्याच चित्र दिसतंय. तेव्हा महाराष्ट्रात लसीचा जास्तीत-जास्त पुरवठा केला पाहिजे. रुग्णाच्या प्रमाणत लास मिळावी यासाठी पाठपुरावा चालू आहे. लसीचा पुरवठा हा प्रश्‍न असून चिंता असल्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच नाईलाज झाला तर लॉकडाऊन करावं लागेल असही ते म्हणाले.

रुग्णांच्या प्रमाणाने राज्याला लस पुरवली पाहिजे अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केली. तसेच लसीची उपलब्धता आणखी वाढावी म्हणून भारत बायोटिक्सची लस राज्य सरकारच्या मालकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्याची परवानगी केंद्राने राज्य सरकारला द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्याप्रमाणे हॉकिंस कंपनीला भारत बायोटिकच्या कोरोना लसीचा टेक्नॉलॉजी आणि परवानगी द्यावी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

कोरोना वायरस वेगाने पसरत असून आता काळजी घेतली पाहिजे. लसीपासून कोणताही धोका नाही. सर्वसामान्य लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून लसीकरण करून घयावे. जनतेने सहकार्य केले नाही तर नाईलाजाने लॉकडाऊन करावं लागेल. तस झालं तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. पण नाईलाजाने लॉकडाऊन करावं लागेल.

लॉकडाऊन करावा लागला तर थेट लोकांच्या खात्यावर पैसे पोचवा असे आवाहन त्यांनी राज्य आणि केंद्राला केलं. खाजगी लोकांना पगार दिला पाहिजे, असे ते म्हणाले. लॉकडाऊन हा राजकीय विषय नाही. काँग्रेस सरकारला विरोध करत नाही. मुळातच लॉकडाऊन हा राजकीय विषय नसून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने निर्णय घेतला पाहिजे, असे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले.

……………

COMMENTS