Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या रागातून भैरोबा मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्याचा खून

कोरेगाव / प्रतिनिधी : जळगाव (ता. कोरेगाव) येथे एकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. वैभव विकास ढाणे (वय 28 वर्षे, रा. जळगाव, ता. कोरेगाव

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या : श्रीकांत देशपांडे
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी प्रतितास 1200 भाविकांना प्रवेश
सातारा जिल्ह्यात एसटीच्या फेर्‍यांमध्ये वाढ; उत्पन्न वाढल्याने प्रशासनाकडून निर्णय

कोरेगाव / प्रतिनिधी : जळगाव (ता. कोरेगाव) येथे एकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. वैभव विकास ढाणे (वय 28 वर्षे, रा. जळगाव, ता. कोरेगाव) असं मृताचे नाव आहे. या प्रकरणात जळगाव येथील एकासह पाचजणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत युवक मनसेचा कार्यकर्ता असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.
तलवार व कोयत्याचे वार झाल्याने वैभव गंभीर जखमी झाला. गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या गुन्ह्याचा राग मनात धरून संशयितांनी गुरूवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास जळगावमधील भैरोबा मंदिरासमोर वैभववर हत्यारांच्या सहाय्याने हल्ला केला. त्यात वैभव गंभीर जखमी झाला. दरम्यान, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले असून, काही जण फरार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडं पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फरार झालेल्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS