२७ नगरसेवक अपात्रतेसाठी याचिका ; पराभव लागला भाजपच्या जिव्हारी; तीस हजार पाने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२७ नगरसेवक अपात्रतेसाठी याचिका ; पराभव लागला भाजपच्या जिव्हारी; तीस हजार पाने

भारतीय जनता पक्षाचे 27 नगरसेवक जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फुटले होते.

बीडमध्ये सत्यभामा बांगर यांना अटक
कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला 46 लाख रूपयांचा नफा
सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार : 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार

जळगाव/ प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाचे 27  नगरसेवक जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फुटले होते. भाजपने फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. 

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकेवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षाला नामुष्की पत्करावी लागली राज्यातील नगरसेवकाची ही मोठी फूट ठरली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकना अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, भाजपकडून आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याचे सांगण्यात आले. जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे. नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान, असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने दाखल केलेली तीस हजार पानांची याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली.  त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली.

COMMENTS