नगर तालुक्यातील 44 गावांच्या पाणी योजनेची वीज तोडली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर तालुक्यातील 44 गावांच्या पाणी योजनेची वीज तोडली

पाळीव जनावरांसह ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल, आंदोलन इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर व 44 गावांसाठीच्या पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडले गेल्याने या गावांतून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या

कर्जत-जामखेडमध्ये प्रशासन सुस्त
राहुरीतील शिंदे गटाच्या 28 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे
गोदाकाठ महोत्सवातून बचत गटांना पुन्हा उभारी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर व 44 गावांसाठीच्या पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडले गेल्याने या गावांतून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या गावांतील रहिवाशांचा पिण्याच्या व पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असल्याने तातडीने पाणी योजनेचे वीज कनेक्शन जोडले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वीज कंपनीने बुर्‍हाणनगर व 44 गावे पिण्याच्या पाणी योजनेचे वीज कनेक्शन बंद केले असून ते कनेक्शन चालू करण्याच्या मागणीसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दादासाहेब दरेकर, हरिभाऊ कर्डिले, अनिल करांडे, रभाजी सुळ, मधुकर महस्के, बाबासाहेब अमृते, जाईबाई केदारे, मंगल गवळी, विलास लोखंडे, सविता रामपानमळकर, हौसराव नवसुपे, सतीश महस्के, महेश महस्के, शब्बीर शेख, तात्याभाऊ वाघमोडे, राजू वाघमोडे, मीराबाई सुळ, मच्छिंद्र थोरात, हिराबाई मोठे आदींसह संबंधित 44 गावांचे सरपंच-उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. सध्या सणावारांचे दिवस असून महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये ग्रामस्थ आर्थिक अडचणीमध्ये असल्याने पाणीपट्टी वसूल होण्यास अडचण येत आहे. जेवढी पाणीपट्टी वसूल झाली आहेत, ती जमा करून दिलेली आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे व पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तरीदेखील पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणी योजनेचे वीज कनेक्शन जोडले नाही तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ महावितरण कार्यालयासमोर उग्र स्वरुपाचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. वीज बिलाची थकबाकी संपूर्ण माफ करण्यात यावी व यापुढे वीज बिले रेग्युलर करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS