Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ ला वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सातारा / प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधांनाच्या स्

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा
डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ‘नाम’ची ऊर्जा वाढवणारा : नाना पाटेकर
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने 14 मार्च 2022 रोजी वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 27 मार्च दिवसी दीक्षाभूमी सभागृहात त्यांना पुरस्कार देऊन त्यांचासह 50 राष्ट्रीय व 100 राज्यस्तरीय पुरस्कार मानकरी यांचा सन्मान केला जाणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी भदंत नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडे वटीवार, मेंदुरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरिष गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली. त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, शिवाजी 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील,ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ. रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश दुकळे, शिविमचे माजी अध्यक्ष, डॉ. शिवकुमार सोनाळकर यांनी अभिनंदन केले.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे हे मुळचे मळोली, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर या गावचे रहिवासी आहे. त्यांचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी कार्यात योगदान दिले. 31 वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी विवेक वाहिनी सारख्या विधायक कार्य करणार्‍या विकास उपक्रमात मोठे कार्य केले आहे.

COMMENTS