विवेकानंद प्री स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेकानंद प्री स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे विवेकानंद प्रि स्कूल पाथर्डी या शाळेत ज्युनिअर केजी व सीनियर केजी बालवाडी या विद्यार्थ्यांसाठी

पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा ः भाजपची मागणी
अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प
पाट-पाण्याच्या आर्वतनांचे काटेकोर नियोजन करावे

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे विवेकानंद प्रि स्कूल पाथर्डी या शाळेत ज्युनिअर केजी व सीनियर केजी बालवाडी या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थी नृत्य, गायन ,तबला वादन तसेच आकाशात फुगे उडवून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन मनसोक्त आनंद लुटला.प्रत्युषा बडे या विद्यार्थिनीच्या नृत्याने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. या क्रीडा महोत्सवात थ्रोबोल,धावणे,संगीतखुर्ची, फ्रॉकजंप,फुगे फोडणे इत्यादी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसाठी धावण्याच्या स्पर्धा घेऊन आजी आजोबा यांचा आनंद द्विगुणित झाला.प्रत्येक आजी-आजोबांनी आपल्या लहानपणीचा अनुभव याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, समन्वयक ज्ञानेश्वर गायके,मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, संपत घारे, वर्गशिक्षिका सीमा फासे तसेच सर्वच पालक उपस्थित होते. विविध क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके व सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी तर आभार सीमा फासे यांनी मानले. क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी दीपक राठोड,जयश्री एकशिंगे,प्राजक्ता आठरे,आरती दहिफळे, सतीश बोरुडे व अर्चना काळोखे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS