Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची कामे तातडीने सुरू : ना. जयंत पाटील

आष्टा / प्रतिनिधी : आपण जलसंपदा विभागाच्या वतीने आष्टयासह 5 गावातील क्षारपड जमीन सुधारण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवित आहोत. या प्रकल्पात सरकार 80 ट

जुनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन : डॉ. भारत पाटणकर
कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली
कोयनेच्या वीज प्रकल्पाचा ’महानिर्मिती’ समवेत केलेला 35 वर्षाचा करार संपला; प्रकल्प खाजगी प्रवर्तकाकडे हस्तांतरीत होण्याची शक्यता

आष्टा / प्रतिनिधी : आपण जलसंपदा विभागाच्या वतीने आष्टयासह 5 गावातील क्षारपड जमीन सुधारण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवित आहोत. या प्रकल्पात सरकार 80 टक्के खर्च करणार असून लाभार्थी शेतकर्‍यांनी 20 टक्के खर्च करायचा आहे. आपण आपल्या गावात स्थानिक समित्या स्थापन करून लाभार्थींना योजना समजून सांगा, लवकर पैसे उभा करा म्हणजे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करता येतील, असा विश्‍वास राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा येथे बोलताना व्यक्त केला. शेतकर्‍यांना कित्येक वर्षांपासून भेडसाविणारा क्षारपड जमीन सुधारण्याचा प्रकल्प ना. जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्नातून हाती घेतल्याने आष्ट्यातील शेतकर्‍यांनी ना. पाटील यांचा सन्मान केला.
आष्टा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत पथदर्शी भूमिगत चर योजनेतील शेतकर्‍यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पाटबंधारे संशोधन व विकास संचानालयाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश रुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ना. पाटील म्हणाले,आष्टा शहरातील तीन विभागातील 1750 एकर जल संपदा विभागाच्या वतीने सुधारणा करण्यात येणार आहे. याचा 2 हजार 57 शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. यासाठी 13 कोटी 45 लाख रुपये खर्च आहे. यातील 80 टक्के खर्च सरकार करणार आहे. लाभार्थी शेतकर्‍यांनी एकरी 15 हजार 371 रुपये भरावयाचे आहेत. ज्यांना शक्य आहे,त्यांनी रोख रक्कम भरावी. ज्यांना अडचणी आहेत,अशा शेतकर्‍यांच्या साठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने दीर्घ मुदती चे शून्य टक्के व्याजाचे कर्ज देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा. या प्रकल्पातून 2-3 वर्षात क्षारपड जमिनी सुधारणा होऊन 2-3 पिढ्यांचा प्रश्‍न सुटणार आहे.
वैभव शिंदे, बापूसाहेब गाडे, प्रिया लांजेकर, अप्पर तहसिलदार सौ. धनश्री भांबुरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव, युवक राष्ट्रवादीचे शिवाजी चोरमुले, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष राज आटूगडे, माजी नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, अर्जुन माने, उपअभियंता राहुल घनवट, राजेंद्र गाजी, राजारामबापू साखर कारखान्याचे डी. एम. पाटील, संतोष जंगम यांच्यासह आष्टा येथील विविध विभागातील शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक माणिक शेळके यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS