Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तडवळे येथील शिवकालीन ऐतिहासिक गडी नामशेष होण्याच्या मार्गावर

तडवळे : ढासळलेल्या अवस्थेतील बुरूज. फलटण / प्रतिनिधी : तडवळे, ता. फलटण येथे शिवकालीन ऐतिहासिक गढी आहे. त्या गडीचा एक बुरुंज शिल्लक राहून बाकीचे सर

दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई
सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक
शेतकर्‍यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल

फलटण / प्रतिनिधी : तडवळे, ता. फलटण येथे शिवकालीन ऐतिहासिक गढी आहे. त्या गडीचा एक बुरुंज शिल्लक राहून बाकीचे सर्व बुरुज ढासळे आहेत. परंतू उभ्या असणार्‍या बुरुजाचे तोडीचे दगड दिवसेंदिवस ढासळत आहे. हे बुरूज शेवटची घटका मोजत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
याबाबत गडीच्या शेजारी रहिवासी असणारे ग्रामस्थ दशरथ पवार हे सन 2013 पासून यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय व जिल्हा अधिकारी सातारा यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे बुरुजाच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत, असे पवार यांनी सांगितले. गडीच्या या ऐतिहासिक वास्तूची जपणूक व संवर्धन करावे, परंतू वारंवार तक्रारी करूनही आजतागायत येथे कोणाही आले नसल्याची तक्रार दशरथ पवार यांनी केली आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या हा बुरूज ढासळणेच्या स्थितीत असून याच्या तोडीच्या दगडांपासून परिसरातील वास्तव्यास असणार्‍या लोकांना धोका संभवत आहे. बुरुजांचे मोठे मोठे दगड दशरथ पवार यांच्या घराच्या पाठीमागील बाजूने कोसळत थेट मागील दरवाजापर्यंत आले असल्याचे पवार यांनी सांगितले. या प्रसंगाने पवार यांचे कुटुंब चांगलेच भयभीत झाले आहे. तरी गढीच्या बुरुजाची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. भविष्यात जर कोणत्याही प्रकारची जिवीतहानी अथवा वित्तहानी होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS