Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचा फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व सकाळचा माजी कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज.बोठेचा जप्त केलेल्या आयफोनसह तसेच त्याच्याशी संबंधित इतर आरोपींकडून हस्तगत केलेले सहा असे एकूण सात मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड
महिलांनी खळखळून हसले पाहिजे : बिभीषण धनवडे
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षक विक्रम अडसूळ यांना माय स्टॅम्प वितरित

अहमदनगर/प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व सकाळचा माजी कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज.बोठेचा जप्त केलेल्या आयफोनसह तसेच त्याच्याशी संबंधित इतर आरोपींकडून हस्तगत केलेले सहा असे एकूण सात मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

या अहवालातून बोठे व त्याच्याशी संबंधितांच्या फोनमधील धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बोठेबाबत न्यायालयात स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी सर्व माहिती एकत्रित गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भामध्ये काहींचे जाब-जबाबसुद्धापुन्हा घेतले जाणार आहेत. ज्या वेळेला पोलिसांनी आरोपी बोठेच्या घराची झाडाझडती घेतली होती, त्यावेळेला त्याच्या घरातून बोठे वापरत असलेला आयफोन हस्तगत केला होता. पोलिसांनी नंतर त्याचा शोध सुरू केल्यानंतर तो तीन महिन्यानंतर हैदराबाद येथे आढळून आला. तिथे तो दुसरा फोन हैदराबादचा वापरत होता. तो एका गुन्हेगाराचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा फोनसुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच हैदराबादला ज्या ठिकाणी बोठे वास्तव्य करीत होता, तेथील वकील जनार्दन अकुला यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे व त्याचाही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. याशिवाय या घटनेमध्ये ज्यांचा सहभाग आढळून आलेला होता, अशा एकूण सात लोकांचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीला पाठवलेले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरया फोनमध्ये काय आहे, हे उघड होणार आहे. जरे हत्याकांडामध्ये आतापर्यंत पाच आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी बोठे तीन महिन्यानंतर पोलिसांना सापडला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्वतंत्र दोषारोप पत्र दाखल केले जाणार आहे; मात्र खुनाची नेमकी घटना कशी घडली? का घडली? याचा शोध आता पोलिसांना घ्यायचा आहे. हत्याकांड त्याने कशामुळे केले? का केले, हे आता दुसरे पथक दाखल झाल्यानंतर उघड होणार आहे. तसेच बोठेने दिलेल्या माहितीनुसार तो सुरुवातीला म्हणजे 3 ते 10 डिसेंबर असे दहा दिवस नगरच्या रेल्वे स्थानकामध्ये राहत होतो, असे सांगितले असल्याने त्या दृष्टिकोनातून आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबतची काही माहिती पोलिसांनी मागवली आहे. तसेच एकपथक सुद्धा या तपासणीसाठी पाठवलेले आहे.

त्या पाच जणांचे सोमवारी जबाब

बोठेला हैदराबादला असताना मदत करणा-या काहींना पोलिसांनी समन्स बजावले असून, यातील पाच जणांचे येत्या सोमवारी जवाब होणार आहे.पोलिसांनी संबंधितांना नोटीस देऊन जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच बोठेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करायचे असल्यामुळे अन्य काही जणांचे जबाबही यानंतर होणार आहेत. पोलिसांनी आता दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू करून पुरावेसुद्धा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS