युक्रेनची गोची आणि युरोपला संधी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

युक्रेनची गोची आणि युरोपला संधी

सोव्हियत रशियाचे विघटन झाल्यानंतर 1992 मध्ये युक्रेन हा देश अस्तित्वात आला. छोटा भुप्रदेश असलेला हा देश, मात्र विकसिनशील देश आहे. आपल्या देशाची सर्वा

मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
बोगस प्रमाणपत्रांचा गोरधधंदा
अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

सोव्हियत रशियाचे विघटन झाल्यानंतर 1992 मध्ये युक्रेन हा देश अस्तित्वात आला. छोटा भुप्रदेश असलेला हा देश, मात्र विकसिनशील देश आहे. आपल्या देशाची सर्वांगिण प्रगती होण्यासाठी रशियाचे हस्तक बनून राहण्यात, रशियाच्या अधिपत्याखाली राहण्यात युक्रेनला अजिबात रस नव्हता. तर युक्रेनचा ओढा हा उदारमतवादी असलेल्या युरोप खंडाकडे होता. तर युरोप आपल्या महासत्ता होण्याच्या मार्गात आडवे येत असल्याचा समज रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लदिमीर पुतीन यांना होता. त्यामुळे युक्रेन या देशाने आपल्या अधिपत्याखाली राहावे, म्हणजे आपल्याला युरोपला कोंडीत पकडता येईल, अशी रशियाची धारणा होती. मात्र रशियाच्या या धारणेला युक्रेनने ठेस पोहचवली. आणि युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाला. मात्र युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाला असला, तरी नाटोतील सदस्य राष्ट्र उघडपणे युक्रेनची बाजू घेण्यास, त्यांना सैन्य पाठवण्याची मदत करू शकलेले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोला नो फ्लाय झोन जाहीर करण्याची मागणी केली होती. नो फ्लाय धोरणांतर्गत रशियाचे एकही विमान नाटोतील सदस्य राष्ट्राच्या हद्दतीतून प्रवेश करू शकणार नव्हते. मात्र नाटोनी ही मागणी फेटाळून लावली. यातून अनेक बाबी पुन्हा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. युक्रेनचे युरोप आणि रशियाने मिळून सॅण्डविच केले आहे. धर नाटोतील सदस्य राष्ट्र उघडपणे युक्रेनला मदत करतांना दिसून येत नाही, आणि रशियाशी उघडपणे घेतलेले शत्रुत्व यामुळे युक्रेनची मोठी गोची झाली आहे. रशिया-युक्रेन या दोन्ह देशांचे संबंध अचानकपणे बिघडलेले नाही. यामागील पूर्वपिठीका समजून घेणे गरजेचे आहे. युरोप महासंघ आणि रशिया यांच्यातील संबंधाना वैमनस्याचे स्वरूप येण्यास सुरूवात झाली ती अनेक महिन्यापूर्वी. कारण रशियाचे विस्तारवादी धोरण युरोप महासंघाला अजिबात आडवलेले नाही. तर युरोप आपल्या धोरणात ढवळाढवळ करत असल्याचा रशियाचा आरोप आहे. यातूनचे असल्याचे दिसते. अलिकडेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संपूर्ण युरोपात निर्माण झालेले नैसर्गिक वायूचे संकट आणि आता युक्रेनला हस्तगत करण्यासाठी रशियाने केलेले हल्ले यातून या वैमनस्याची प्रचिती येते. रशियाची ही कृती आक्रमक आणि आततायी असल्याचा शिक्का पाश्‍चिमात्य राष्ट्रांनी लावला आहे. मात्र त्याचवेळी रशियने हे आरोप फेटाळून लावत आपण स्वत:च्याच प्रदेशात वावरत असल्याचा दावा केला आहे. पाश्‍चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी डिसेंबरमध्येच दावा केला होता की, युक्रेनच्या सीमेलगत रशियाने सुमारे 1,00,000 इतके सैन्य तैनात केले आहे. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाकडून आक्रमण केले जाणार असल्याच्या चर्चांना अफवा म्हणत त्या फेटाळून लावल्या आहेत. त्याऊलट युक्रेनवर रशियाच्या पूर्वेकडील प्रदेशालत सुमारे 1,25,000 इतके सैन्य तैनात केले असल्याचा प्रतिदावा रशियाने केला होता. त्यामुळे रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची युद्धनीती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच केली होती. डिसेंबरमध्ये सीमेभोवती प्रत्यक्षात सैन्य तैनात केले होते. त्यानंतर 24 फेबु्रवारीपासून प्रत्यक्षात युद्धाला सुरूवात झाली. या कालावधीत कोणताही देश रशियाला युद्धापासून परावृत्त करू शकला नाही. युकेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सक्की यांना आपल्या मदतीसाठी अमेरिका किंवा नाटोतील सदस्य राष्ट्र धावून येतील, आपले सैन्य आमच्या मदतीला पाठवतील, आर्थिक रसदीबरोबरच, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आपल्या दिमतीला पाठवतील, अशी अपेक्षा युक्रेन बाळगून होता, मात्र युक्रेनचा तो गैरसमज नाटोतील सदस्य राष्ट्रांनी खोडून काढला. आज युक्रेन एकाकी पडला आहे. आज युद्धविराम जाहीर केला असला, तरी आज ना उद्या युद्ध संपेल देखील. मात्र युक्रेनचे जे मोठे नुकसान झाले आहे, जी जीवितहानी झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. युक्रेन अण्वस्त्रधारी देश असतांना देखील त्यांनी त्याचा त्याग करणे त्यांना आज जड जात आहे. युक्रेन जर आजही अण्वस्त्रधारी देश असता, तर रशिया अशी आगळीक करू शकला नसता. त्यामुळे युरोप आणि रशियाच्या भांडणात युक्रेनने आपले मोठे नुकसान करून घेतले आहे. मात्र यानिमित्ताने युरोपला मोठी संधी आहे.

COMMENTS