शहर काँग्रेसने रस्ते दुरुस्तीसाठी दिला मनपाला महिन्याचा अवधी ; व्यापार्‍यांसह आयुक्तांशी केली चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर काँग्रेसने रस्ते दुरुस्तीसाठी दिला मनपाला महिन्याचा अवधी ; व्यापार्‍यांसह आयुक्तांशी केली चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : येत्या एक महिन्याच्या कालावधीच्या आत जर व्यापार्‍यांच्या व काँग्रेसच्या मागणीप्रमाणे रस्त्यांची नवी कामे जर बाजारपेठेमध्ये पूर्ण

मुलंही आईपेक्षा मोबाईलच्या सहवासात शांत राहतात हा मातृत्वाचा पराजय:- गणेश शिंदे
माळीबाभूळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांच्यासह तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : येत्या एक महिन्याच्या कालावधीच्या आत जर व्यापार्‍यांच्या व काँग्रेसच्या मागणीप्रमाणे रस्त्यांची नवी कामे जर बाजारपेठेमध्ये पूर्ण केली नाही तर काँग्रेसला रस्त्यावर उतरेल, असा इशारा शुक्रवारी शहर काँग्रेसद्वारे महापालिकेला दिला गेला. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी व्यापार्‍यांसमवेत आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन बाजारपेठेच्या दयनीय अवस्थेची माहिती दिली. दरम्यान, मनपा आयुक्तांनी यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर तात्काळ कारवाई करून बाजारपेठेचा श्‍वास लवकरात लवकर मोकळा करण्याचे काम मनपा प्रशासन करेल, असे आश्‍वासन दिले.
चितळे रोड, दाळमंडईसह बाजारपेठेतील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शहर जिल्हा काँग्रेसने गुरुवारी स्वाक्षरी मोहीम कापड बाजारात राबवली व बाजारपेठेतील रस्ते धूळमुक्त व खड्डे मुक्त करण्याची मागणी केली. या मोहिमेत संकलित झालेल्या स्वाक्षर्‍यांसह निवेदन घेऊन शहर जिल्हाध्यक्ष काळेंसह काँग्रेस पदाधिकारी व व्यापारी शुक्रवारी मनपा आयुक्त गोरे यांना भेटले. यावेळी झालेल्या बैठकीला उपायुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रवीण गीते, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, अमृता हरिभाऊ कानवडे, कौसर खान, प्रशांत जाधव, निजाम जहागीरदार, मोहम्मद हनीफ जहागीरदार, इम्रान बागवान, आप्पा लांडगे, निसार बागवान आदी उपस्थित होते. यावेळी व्यापार्‍यांसह काँग्रेस शिष्टमंडळाने आयुक्तांशी सुमारे पाऊण तास चर्चा केली व रस्ते करण्यासाठी तीस दिवसांचा अल्टिमेटम दिला तसेच कामाचा तपशील असणारे जाहीर फलक लावण्याची मागणीही केली. चितळे रोड, तेलीखुंट, दाळमंडईसह संपूर्ण बाजारपेठ तातडीने धूळमुक्त करीत बाजारपेठेतील रस्ते तसेच प्रलंबित असणारी इतर विकास कामे तातडीने पूर्ण करण्याची गरजही यावेळी मांडण्यात आली. काळे यांनी व्यापार्‍यांच्या समस्यांचा पाढाच आयुक्तांसमोर वाचत त्यांना धारेवर धरले.
यावेळी स्वाक्षरी मोहिमेसह लिखित निवेदन आयुक्तांना दिले गेले. यावेळी व्यापार्‍यांच्यावतीने बोलताना काळे म्हणाले की, भुयारी गटारीची अंतर्गत कामे, पाण्याच्या लाईनसाठी केलेले खोदकाम तातडीने पूर्ण करुन बुजवावे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. यासाठी कमीत कमी कालावधीची कालमर्यादा ठेकेदाराला निश्‍चित करून द्यावी. दिवसाचा कालावधी व्यापार्‍यांसाठी व्यवसायाचा असतो. पण, याच कालावधीत जर बाजारपेठेमध्ये ठेकेदार काम करत असेल तर व्यापारी व ग्राहकांची गैरसोय होते. ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. व्यापार्‍यांचा धंदा होत नाही. त्यामुळे मनपाने रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेमध्ये कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्याची मागणी काळेंनी केली.

त्याबाबतही समज द्या
बाजारपेठेत काम करणारा ठेकेदार व्यापार्‍यांना उडवाउडवीची उत्तरे देणार नाही, त्यांना सरकारी कामात अडथळा आणला असे म्हणत विनाकारण गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार नाही किंवा व्यापारी बांधवांशी गैरवर्तन करणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना व समज ठेकेदाराला देण्याची मागणी काळेंनी यावेळी केली. आयुक्तांनी स्वतः संबंधित अधिकार्‍यांसह प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन पाहणी करावी व व्यापार्‍यांशी संवाद साधावा, असेही त्यांनी सुचवले. दरम्यान, बाजारपेठेसह शहरातील रस्ते हा काही राजकारण करण्याचा विषय नाही. तरी देखील याचे श्रेय ज्यांना कुणाला घ्यायचे असेल, त्यांनी ते जरूर घ्यावे. काँग्रेसला फोटोसेशन करीत व चमकोगिरी करून श्रेय घेण्यात रस नाही. मात्र व्यापार्‍यांना व नागरिकांना कोणी वेठीस धरू नये, असे सूचक भाष्यही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS