जामखेडच्या राजकारणात धक्कातंत्र ;

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडच्या राजकारणात धक्कातंत्र ;

विखेंचे कट्टर समर्थक राळेभात बंधूंचा राष्ट्रवादीत प्रवेश :

जामखेड प्रतिनिधी : माजी मंत्री राधाकृष्ण विखे व खा सुजय विखे यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात,बाजार समितीचे माजी उपसभापती  सुधीर

पावसाअभावी शेतकरी हतबल
आ.आशुतोष काळेंना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून द्या : सत्येन मुंदडा
वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…

जामखेड प्रतिनिधी : माजी मंत्री राधाकृष्ण विखे व खा सुजय विखे यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात,बाजार समितीचे माजी उपसभापती  सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश झाला आहे.

या प्रवेशाने जामखेड तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. विखे गट व माजी मंत्री राम शिंदे यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी आपला चाणाक्षपणा वापरत मतदारसंघात कामाचा वेगळा ठसा उमटवून लोकांना आपलंसं केल आहे.दि ५ मार्च रोजी पूणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुधीर राळेभात व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात या बंधुंचा भाजपातुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवला आहे. यावेळी सभापती सूर्यकांत मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जेष्ठ नेते जगन्नाथ राळेभात यांची ही दोन मूलं आहेत. राळेभात हे मुळ काँग्रेसचे विखे समर्थक कुटुंब आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून विखेंबरोबरच हे राळेभात कुटुंब भाजपा मध्ये आले होते.  सध्या  सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

COMMENTS