चार्जशीटसाठी शासनाकडे मागितली परवानगी ; सिव्हिलमधील आग प्रकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार्जशीटसाठी शासनाकडे मागितली परवानगी ; सिव्हिलमधील आग प्रकरण

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी तयार केले असून, ते न्

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच
आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी तयार केले असून, ते न्यायालयात दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी मागितली आहे. या परवानगीनंतर हे दोषारोप पत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात मागील 6 नोव्हेंबर 2021 रोजी अतिदक्षता विभागाला आग लागून 14जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304, 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्धचे दोषारोपपत्र तयार झाले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपी लोकसेवक असल्याने त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे पोलिसांनी भादंवि कलम 197 नुसार हे दोषारोपपत्र सरकारच्या परवानगीसाठी पाठविले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अटक करून जामिनावर सुटका झालेला आरोपी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याचाही या दोषारोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना आनंता यांना आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी चौकशी समितीने पोलिसांना दिलेल्या अहवालात डॉ. पोखरणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली होती. त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला असल्याने त्यांची तात्काळ जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यांच्यासह पाचजणांविरूध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. डॉ. पोखरणा, परिचारिका पठारे, शेख, आनंता हे लोकसेवक असल्याने त्यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी पोलिसांनी सरकारकडे दोषारोपत्र पाठविले आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांकडून हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

COMMENTS