मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास

नगर तालुक्यातील निंबोडीत सात वर्षांपूर्वीची घटना

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील निंबोडी गावात सन 2015 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणाच्या गुन्ह्यातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्य

शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक, पाच पोलिस जखमी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील निंबोडी गावात सन 2015 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणाच्या गुन्ह्यातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले. जयराम कचरू बेरड, शरद चंद्रभान बेरड, भैरवनाथ सूर्यभान बेरड, अंबादास बाबासाहेब बेरड, मिनीनाथ पोपटराव वाघस्कर, सचिन पोपट वाघस्कर, नाथा चंद्रभान बेरड, देवराम उर्फ ज्वलन चंद्रभान बेरड, जयदीप दत्तात्रय कराळे, दीपक बबन बेरड, सत्यम नाथा बेरड, विकास कचरू बेरड, ईश्‍वर सखाराम बेरड, वैभव बाळासाहेब बेरड (सर्व रा. निंबोडी ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 26 ऑक्टोबर 2015 रोजी निंबोडी गावातील तक्षशिला बौद्ध विहार समाज मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात फिर्यादी विवेक मुकुंद भिंगारदिवे, सुनील अनिल जाधव, सुनील जगन्नाथ केदारे इतर मुले ’द ग्रुप ऑफ नमो बुद्धाय’च्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाची तयारी करत होते. यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना अपमानीत करीत कार्यक्रमाचे पत्रक फाडण्याच्या कारणावरून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली होती तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपींविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयामध्ये साक्षीदारांनी दिलेला तोंडी साक्षी पुरावा व सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सर्व आरोपीना 1 वर्ष तुरूंगवास व प्रत्येकी रुपये 1 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपी व फिर्यादी एकाच गावातील असल्याने व भविष्यात वाद करणार नाहीत म्हणून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. खटल्यामध्ये पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार डी. डी. दुबे यांनी सहाय्य केले.

COMMENTS