महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ठाणे : सध्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे योग्य वितरण करण्यासाठी राज्याची पारेषण यंत्रणा सक्षम आहे. महापारेषणच्या नियोजित इमारतीमध्ये वाश

मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
राजधानीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ – पालकमंत्री भरणे

ठाणे : सध्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे योग्य वितरण करण्यासाठी राज्याची पारेषण यंत्रणा सक्षम आहे. महापारेषणच्या नियोजित इमारतीमध्ये वाशी परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे महापारेषणचे व्यवस्थापन व समन्वय राखण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी या इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जेची यंत्रणा उभारावी, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ऐरोली संकुलातील महापारेषणच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे मुख्य सल्लागार उत्तमराव झाल्टे, संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, अधीक्षक अभियंता पीयूष शर्मा, मोहन ननवरे उपस्थित होते. ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले,“तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर वाशी परिमंडळाचे कार्यालय अपुऱ्या जागेत कार्यान्वित झाले होते. इतर कार्यालयेही ऐरोली संकुलात आहेत. महापारेषणची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी एकाच छताखाली सर्व कार्यालये होणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल. तसेच अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढेल. संरक्षक भिंत व सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. अग्निसुरक्षा व अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुसज्ज वसाहत, क्लब हाऊस, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटनसाठी क्रीडांगण, योगा कक्ष, वाचनकक्ष, आधुनिक ग्रंथालय, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैवविविधतेच्या दृष्टीने उद्याने, शेततळे, जॉगिंग ट्रॅक करावेत. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रातिनिधीक अडचणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऐकून घेतल्या. तसेच त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

COMMENTS