युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्बने हल्ला ; 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्बने हल्ला ; 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू

कीव्ह/वृत्तसंस्था : युक्रेन-रशियामध्ये सोमवारी बेलारूसमध्ये चर्चेच्या फैरी झडत असतांनाच रशियन सैन्यांकडून युके्रनची राजधानी असलेल्या कीव्ह शहरावर क्ष

शाळेच्या बसचा भीषण अपघात , २ जण ठार तर २ गंभीर जखमी | LOKNews24
कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय होणार सुरु ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
महाबळेश्‍वरवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

कीव्ह/वृत्तसंस्था : युक्रेन-रशियामध्ये सोमवारी बेलारूसमध्ये चर्चेच्या फैरी झडत असतांनाच रशियन सैन्यांकडून युके्रनची राजधानी असलेल्या कीव्ह शहरावर क्षेपणास्त्रासह रॉकेटचा मारा करण्यात येत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून, 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा दावा युक्रेनच्या नेत्याने केलाय. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केला. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब अस म्हटले जाते.विशेष म्हणजे हा मारा नागरी वसाहतीवर करण्यात येेत असल्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार माजला असून, रशिया आपले सैन्य मागे घेेण्याच्या तयारीत नसल्यामुळे जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसर्‍या फेरीची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही चर्चा बेलारूसच्या सीमेवर पार पडली. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी लवकरच चर्चेची दुसरी फेरी ‘त्वरित युद्धविराम आणि युक्रेनमधून रशियन सैन्याची माघार हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेचा मुख्य उद्देश आहे’. मात्र रशिया कोणत्याही शांततेच्या वाटाघाटी करण्याच्या मानसिकेत नसल्याचे दिसून येत आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरुच आहेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणार्‍या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेनने केला.युध्दाच्या सहाव्या दिवशी रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्त्रांच्या केलेल्या मार्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. राजधानी कीव्ह शहराच्या दिशेने रशियन सैन्याची आगेकूच करत 64 किलोमीटर परिसर व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. खार्किव्ह आणि कीव्ह या शहरांच्या मध्यभागी असलेल्या युक्रेनच्या लष्करी छावणीवर रशियाने हल्ला केला. यामध्ये 70 हून अधिक युक्रेनच्या सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या आपत्तकालीन बैठकीत भारतासह अन्य 13 देशांनी भाग घेतला नाही. युध्दाचा पाचव्या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत रशियाने 56 रॉकेटसह 113 क्रुझ क्षेपणास्त्र युक्रेनवर डागली आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी दिली. राजधानी कीव्ह शहराच्या दिशेने रशियन सैन्याची आगेकूच करत 64 किलोमीटर परिसर व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. कीव्हमधील नागरिकांनी शहर सोडावे, असे आवाहन सोमवारीळ रशियन सैन्याने केले होते. दरम्यान, जर्मनीसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी युक्रेनला लष्करी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS