दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन

अहमदनगर/प्रतिनिधी : देशातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांना आवश्यक असलेल्या साधन

अखेर चौंडीचे उपोषण सुटले
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे
बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा येथे कला कार्यशाळा उत्साहात  

अहमदनगर/प्रतिनिधी : देशातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांना आवश्यक असलेल्या साधन साहित्याची निर्मिती सुध्दा देशात सुरू केली आहे. यातून दिव्यांग व ज्येष्ठांना आधार देण्याचे काम केंद्र सरकारद्वारे होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांनी सोमवारी येथे केले. दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्‍वास मिळावा यासाठी बोलता न येणार्‍या शून्य ते पाच या वयोगटातील मुलांची सर्जरी सुध्दा देशात करणे सुरू केली असून, यासाठीचा सहा लाखांचा संपूर्ण खर्चही केंद्र सरकारच करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील ज्येेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थ्यांना साधन साहित्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केडगाव येथील निशा लॉन्समध्ये डॉ. विरेंद्रकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे, आ.मोनिका राजळे, खा.डॉ. सुजय विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक मनोज कोतकर, धनंजय जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
राष्ट्रीय वयोश्री योजनेत 60 वर्षांवरील ज्येेष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, कमोड, श्रवणयंत्र, मानेचा, पाठीचा पट्टा, कृत्रिम दात, चष्मा आदी साहित्य मोफत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील 37 हजार ज्येष्ठ नागरिकांना सुमारे 37 कोटी 95 लाख रुपयांचे साधन साहित्य केंद्र सरकारच्यावतीने मोफत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर 14 कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यातील 895 पात्र लाभार्थींना साहित्य वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांमधून या साधन साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. विरेंद्रकुमार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू झाली. आता आणखी एक पाउल पुढे टाकून दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात असून, या व्यक्तींमध्ये नवा आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी कर्ज योजना सुरू केली असून यातूनव या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. दिव्यांग व्यक्तींची साधने यापूर्वी परदेशातून मागवावी लागत होती. महागड्या किंमतीच्या या वस्तू घेणे मुश्कील होते म्हणूनच आता ही साधने देशातच उत्पादीत करण्यात येणार असून, यातून देशाच्या आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाऊल पुढे पडले असल्याचे त्यांनी सांगितले.
खा.डॉ. विखे यांनी स्वागत करताना पंतप्रधान मोदीचे सरकार गरीबांचे सरकार असल्याचा संदेश या योजनेतून मिळाला आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यात एक लाखापर्यत व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवू देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या योजनेतील एल्मिको या सहभागी कंपनीचे अधिकार्‍यांनी साहित्याचे वितरण प्रात्यक्षिकासह केले.

महाविकासने पैसे देऊन गर्दी जमवली- डॉ. विखे
मंत्री मलिक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनात जमलेली गर्दी ही पैसे देऊन जमविलेली गर्दी होती, असा दावा खा. डॉ. विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. जी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात आहे, ती भीती सामान्य लोकांच्या मनात असती तर जनता स्वतःहून रस्त्यावर उतरली असती. जनतेच्या मनात भीती नाही. मंत्र्यांचे भ्रष्टाचार व त्यांनी केलेली चुकीची कामे यामुळे जर त्यांना शिक्षा होणार असेल तर त्याला जनता कधी पाठिंबा देणार नाही. देशाविरोधात काम करणार्‍यांना साथ देणार्‍यांबरोबर जनता कधीही राहत नाही, असा दावा करून ते म्हणाले, जनता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा कार्यक्रम करेल. राज्य सरकारमधील मंत्र्यांना खरेतर मराठा आरक्षणासाठी वेळ नाही. त्यांचा सगळा वेळ भ्रष्टाचारात जात आहे. त्यांच्या मनात धाकधूक आहे की यापुढे काय होईल व कोणावर धाड पडेल या भीतीत ते जगत आहेत. पण, ज्या माणसाचे चरित्र साफ आहे, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. अशा मंत्र्यांनी तरी मराठा आरक्षणासाठी वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS