शिवजयंती मिरवणुकीत डीजे दणदणाट…चार गुन्हे दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवजयंती मिरवणुकीत डीजे दणदणाट…चार गुन्हे दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी एकूण 22जणांविरुद्ध गुन

विद्यार्थ्यांनी अगस्ती शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे ः नाईकवाडी
कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा ; भाजपच्या प्रा. राम शिंदेंना पुन्हा धक्का
डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मुलीची एमबीबीएसला निवड

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी एकूण 22जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून डीजेचे चार मिक्सर मशीन जप्त करण्यात आले आहे. आशा टॉकीज चौक व माणिक चौकात पोलिसांनी ही कारवाई केली.
शिवजयंती उत्सवानिमित्त विनापरवाना मिरवणूक काढून सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठया आवाजात म्हणजेच 104.7 डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डॉल्बी स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन व विनामास्क तसेच संसर्गजन्य रोगाचा प्रसार होईल असे वर्तन करुन तसेच 500 पेक्षा जास्त लोकांना एकत्र करुन शनिवारी दिनांक 19 सायंकाळी मिरवणूक काढून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जमादार राजेंद्र गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि. कलम 188,269, तसे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3,15 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये ओमकार रमेश घोलप, ऋषिकेश दत्तात्रय कावरे, रोहित रमेश सोनेकर, शुभम नागेश कोनाकुळ, महेश बाळासाहेब चिंतामणी व डी.जे.मालक कपिल दिगंबर ढोकणे (रा. नागापूर, ता.जि.अ.नगर), तसेच संकेत सूर्यकांत जाधव, राहुल श्रीपाद कातोरे, सोनू दीपक पवार, अक्षय सुरेश शिंदे, उमेश राजू काटे व डीजे मालक शुभम दिलीप राहिंज (रा. वाकोडी फाटा, नगर) आणि आदेश राजेंद्र झेंडे, वृषभ किशोर शिंदे, नितीन मुकुंद सुरसे, विशाल मच्छिंद्र शिरवाळे व डीजे मालक विकास रमेश अकोलकर (वय 25, रा. स्टेशन रोड, मल्हार चौक, अहमदनगर) तसेच मयूर श्याम साठे, शुभम ज्ञानदेव सुडके, राकेश ठोकळ, अमोल दत्तात्रय गोरे, गणेश भुजबळ, रेवन्नाथ पांडुरंग पोळे (रा. दरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार, पिंगळे, उपनिरीक्षक मनोज कचरे व सुखदेव दुर्गे करीत आहेत.

COMMENTS