तत्त्वतत्त्व आणि नैतिक सत्ताकारणाचे ऱ्हास पर्व ! आणि नैतिक सत्ताकारणाचे ऱ्हास पर्व !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तत्त्वतत्त्व आणि नैतिक सत्ताकारणाचे ऱ्हास पर्व ! आणि नैतिक सत्ताकारणाचे ऱ्हास पर्व !

  आर. के. लक्ष्मण हे प्रख्यात कार्टूनिस्ट यांनी एकदा तयार केलेले कार्टून भारतीय राजकारणातील व्यक्तींविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे होते. त्यांनी तय

डॉ.सुरेश साबळे यांच्या निलंबाच्या विरोधात बीडमध्ये जन आक्रोश !
पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले .
विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे

  आर. के. लक्ष्मण हे प्रख्यात कार्टूनिस्ट यांनी एकदा तयार केलेले कार्टून भारतीय राजकारणातील व्यक्तींविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे होते. त्यांनी तयार केलेल्या कार्टून मधून जे सूचित केले होते त्यातून भारतीय राजकारणाचा एक प्रकारे दर्जाही कळला होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की निवडणूक आलेली आहे, यात तुम्हाला मतदानही करायचे आहे; मात्र चोर, खुनी, दरोडेखोर,  यापैकी कोणाला मतदान करायचं हेच फक्त तुम्हाला ठरवायचं आहे. त्यांचं हे कार्टून काही प्रमाणात अतिशयोक्तीच असं कोणी म्हणत असेल तरी, त्यात किती वास्तव होतं, हे आज महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध राणे या वादामध्ये आपल्याला बघायला मिळतं. राणे हे बोलण्याच्या बाबतीत दुसऱ्यांच्या इशाऱ्याने बोलतात हे आजपर्यंतच्या राजकारणात सिद्ध झालेल आहे. तर शिवसेनेचे नेते जे काही बोलतात ते मातोश्री वरूनच ठरवलेले असते हे देखील या दीर्घ काळामध्ये सिद्ध झाले आहे. परंतु आज प्रश्न आहे कि राणे आणि शिवसेना यांच्या दरम्यान जो वाद-प्रतिवाद सुरू आहे, तो म्हणजे कोणाचा खून कोणी केला, कोणी काय केलं, या संदर्भात एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणारे आहे. वादविवादाचे हे स्वरूप पाहिले तर सामान्य माणसाच्या मनामध्ये निश्चितपणे असा विचार येईल की, या राजकारण्यांना अशा पद्धतीचे हिंसक राजकारण करायचे असते तर हे जनहिताचा किंवा जनकल्याणाचा आव नेमका आणतातच कसा? अर्थात शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद जुनाच असला तरी राणेंचा शिवसेनेविरुद्ध उपयोग करून घेण्याचे भाजपाने  ठरवलेले दिसते; किंबहुना, त्यासाठीच त्यांना केंद्रीय मंत्री पदावर ठेवले गेले आहे. दोन असत्यांच्या भांडणात सत्य बाहेर येतं अशा आशयाची एक म्हण आहे, या म्हणीचा अर्थ या दोघांच्या संभाषणातून बाहेर येत आहे, असे आता महाराष्ट्राच्या जनतेला जाणवते. कधीकाळी एकाच राजकीय मंचावरून ज्या घटना घडल्या किंवा त्यांच्या आजच्या आरोप-प्रत्यारोप अनुसार घडवल्या गेल्या त्या घटनांना उजाळा देऊन ते फक्त एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करीत नसून भारतीय राजकारणाचा दर्जा किती घसरलेला आहे याचा पाढाच वाचत आहेत.  अर्थात भारतीय राजकारण या देशातील उच्च जातिव्यवस्थेने हे गुन्हेगारीकडे वळविण्याचे षड्यंत्र दीर्घकाळापासून जाणीवपूर्वक जोपासलेले आहे. या षड्यंत्राचा भाग म्हणून भारतीय राजकारण आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले दिसते. वरवर पाहता लोकशाही व्यवस्था राबवितांना आपल्याला दिसते परंतु प्रत्यक्षात जर आपण सत्ताकारणाचा प्रभाव पाहिला तर तो मनी, माफिया, मिडिया या त्रिसूत्री भोवती जो पैशाच्या अनुषंगाने फिरत आहे! तत्वविसंगत आणि लोकशाही व्यवस्थेला न जुमानणारे असे दिसत आहे. अर्थात महाराष्ट्र हा एकूणच वैचारिक क्षेत्राचा, प्रबोधनाच्या चळवळीचा, समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा एक अग्रणी प्रदेश आहे.  महाराष्ट्र सारख्या अतिशय प्रगत असणाऱ्या आणि देशात सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या या राज्यात ज्या पद्धतीने राजकारण आणि सत्ताकारण हे ् खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे वाटू नये, असाच प्रकार सध्या दिसून येतो आहे. सामाजिक न्यायविभागाच्या अखत्यारित सामाजिक अन्याय कसा होईल, अशा पद्धतीच्या योजना पुढे आणल्या जातात. नुकतेच राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाले मात्र या महिला धोरणाला कोणताही बुड आणि पाया असल्याचे दिसत नाही. एखादे धोरण किंवा कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी जनतेची मते लक्षात घ्यावी लागतात, हे लोकशाही तत्व वर्तमान केंद्र सरकार ज्या पद्धतीने पायदळी तुडवत आहे तीच पद्धत महाराष्ट्राची महाविकासआघाडी देखील अवलंबितांना दिसते. तर एकूणच राजकारणाचा झालेला तात्विक आणि नैतिक ऱ्हास हा सत्ताकारणालाही सामाजिक विसंगत कसा बनवतो आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दर दिवशी सेना-भाजप या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करीत आहे परंतु ही बाब देखील आता महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपल्यातच संघर्ष ठेवून, जनतेला कोणत्याही हक्काच्या विषयी जागृती येऊ नये आणि त्यांनी आपले हक्क मागू नये यासाठी केलेला एक बनाव असे याचे स्वरूप आता दिसू लागले आहे.

COMMENTS