आण्णा हजारे जागे झाले !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आण्णा हजारे जागे झाले !

  किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र वाद उभा राहिला आहे. या वादात आता उपोषण सम्राट आणि गेली सात वर्ष

BMW कारची 4 जणांना धडक
विभागीय महिला भजन स्पर्धेत बर्दापूरचचा संघ प्रथम
पंडीत भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

  किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र वाद उभा राहिला आहे. या वादात आता उपोषण सम्राट आणि गेली सात वर्ष मोदी सरकारच्या काळात अक्षरशः झोपी गेलेले अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी २०१२ मध्ये जंतर-मंतर वर केलेले आंदोलन आणि त्यानंतर देशात विशेषतः केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले भाजपा सरकार सत्तेत आले. यानंतर देशात अनेक वादग्रस्त बाबी घडत राहिल्या. देशातील विचारवंत, लेखक, कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी सातत्याने आरोप केला की, देशात घोषित आणीबाणी पेक्षाही अघोषित आणीबाणी अधिक भयावह आहे. देशात  माहितीच्या अधिकारासाठी अण्णा हजारे यांनी मोठ्या आंदोलनातून लोकशाहीत जनतेला माहितीचा अधिकार मिळवून दिला. त्यानंतर प्रत्येक्षात हा माहितीचा अधिकार कमकुवत करण्याचे कार्य केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असतानाही अण्णा हजारे याविरोधात काहीही बोलायला तयार नाही. देशात फॅसीझम सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विचारवंत, लेखक, कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सामाजिक संघटना या सगळ्यांकडून होत असतानाही अण्णा हजारे कोणतेही आंदोलन, सत्याग्रह किंवा ते ज्यासाठी प्रसिद्ध आहेत असे आमरण उपोषण देखील त्यांनी गेल्या सात वर्षात केल्याचे आठवत नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अण्णा हजारे यांना उपोषणासाठी आलेली जाग म्हणजे त्यांच्यावर संघ – भाजप धार्जिणे असल्याचा जो आरोप केला जातो, त्यात काहीतरी तथ्य असल्याचे आता जनसामान्यातून बोलले जाते. वास्तविक पाहता अण्णा हजारे सारखे समाजधुरीण ज्या समाजात आदर्श असतात त्या समाजातील तरुण वाईन पिणे किंवा व्यसनाधीन होणे असा प्रकार कसा संभवू शकतो? परंतु याविषयी अण्णा हजारे यांना विश्वास न वाटणे हे दोन गोष्टींचे निदर्शक आहे. त्यातील पहिली गोष्ट अशी की अण्णा हजारे यांचे किंवा यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांचा तरुणांसमोर आदर्श उभा राहिला नाही, असे त्यांनाच वाटते, आणि दुसरे आजच्या तरुण पिढीवर अण्णांनी थेट व्यसनाधीन असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. अण्णा हजारे यांना महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जर खऱ्या अर्थाने माहित असेल तर त्यांना हे देखील माहीत असावे की डिझेल, पेट्रोल किंवा पेट्रोलियम पदार्थ हे केवळ पेट्रोल पंपा वरच मिळत नाहीत, तर गावात दुर्गम भागातील खेड्यापाड्यात प्रत्येक किराणा दुकानावर बेकायदेशीरपणे डिझेल, पेट्रोल विकले जाते. त्या डिझेल, पेट्रोल मध्ये अनेक प्रकारची भेसळ असते तरीही ते सर्रास विकले जाते. आणि परवानगी नसलेल्या किंवा बेकायदेशीर असलेल्या या व्यवसायातून काळा पैसा कमावला जातो आणि त्यातून गावात किंवा दुर्गम भागाच्या खेड्यापाड्यात काहीजणांकडे जो मुबलक पैसा येतो त्यातून गावातील व्यसनाधीनता वाढते.  जेथे एखाद्या वस्तूवर बंदी आणली जाते तेथे ती वस्तू मुबलक मिळायला लागते. अण्णा हजारे यांनी गुजरात चे उदाहरण बघायला हवे. गुजरात सारख्या राज्यात बंदी असूनही ज्या मुबलक प्रमाणात दारू विकली जाते ती अन्य कोणत्याही राज्यात दिसत नाही. अर्थात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीचा निर्णय घेऊन फार समाजहिताचे काम केले असे म्हणता येत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर राज्यातील अनेक परवानाधारक दुकानांच्या समोर दारू घेण्यासाठी तरुणांच्या रांगा दिसतात. या रांगा तरुणाईच्या व्यसनाधीनतेच्या निदर्शक नाहीत तर काही तरुण या व्यसनाच्या अधीन झाले आहेत असे फार तर म्हणता येईल. अजूनही महाराष्ट्रात आणि विशेषतः ग्रामीण भागात तरुण पिढी गावातील वडीलधाऱ्यांचा आदर्श ठेवत नसली तरी मान-सन्मान निश्चितपणे ठेवतात. त्यामुळे गावातील तरुण थेट गावात कोणत्याही प्रकारचे व्यसन करतात असे थेटपणे म्हणता येत नाही. अर्थात कोणत्याही प्रकारचे व्यसन हे वाईट असते. वाईन मध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते म्हणून त्याच्या विक्रीची सर्रास परवानगी देणे हे देखील चुकीचे आहे. मात्र अर्थशास्त्राचा एक उपयोगिता सिद्धांत जर आपण पाहिला तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते कि जी वस्तू अधिक प्रमाणात बाजारात उपलब्ध होते आणि मानव समाजाकडून तिचा उपभोग घेतला जातो तितकी त्या वस्तूची कालांतराने मागणी आणि गरज कमी कमी होत जाते. सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हेच म्हणतो की एखाद्या वस्तूचा माणसाने उपयोग केल्यानंतर त्या वस्तू विषयी त्याची ओढ कमी कमी होत जाते. या सिद्धांतानुसार जर आपण विचार केला तर वाईन विक्रीच्या परवानगी नंतरही फार काही विपरीत होईल असे समजण्याचे कारण नाही.

COMMENTS