कर्नाटकात हिजाब प्रकरण चिघळले ; तीन दिवस शाळा-कॉलेज बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकात हिजाब प्रकरण चिघळले ; तीन दिवस शाळा-कॉलेज बंद

बंगळुरू : कर्नाटकातील उडूपी येथे हिजाब परिधान करून कॉलेजला येण्याच्या मुस्लिम विद्यार्थींनीविरोधात इतर विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवल्यामुळे हे प्रकरण

भिडे वाडा स्मारक उभारणीचे काम लवकरच सुरू होईल ः मुख्यमंत्री शिंदे
महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन मध्ये ’डाईंग व प्रिंटींग’ पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता

बंगळुरू : कर्नाटकातील उडूपी येथे हिजाब परिधान करून कॉलेजला येण्याच्या मुस्लिम विद्यार्थींनीविरोधात इतर विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवल्यामुळे हे प्रकरण मंगळवारी चांगलेच चिघळल्याचे दिसून आले. याविषयीचे पडसाद दुसर्‍या दिवशी कर्नाटकात उमटले. मात्र या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. हिजाब बंदीच्या वादात आता शिमोगा येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी वर भगवा झेंडा फडकावत आहे, तर बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत आहेत. तेथे जमलेले बहुतांश विद्यार्थी भगवे झेंडे आणि उपरणे फडकावत होते. कर्नाटक हायकोर्टात हिजाबच्या वादावर सुनावणी सुरू असताना आणि हिजाब घालण्यावरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात वाद सुरू असताना, निदर्शने आणखी तीव्र झाली आहेत. मंगळवारी कर्नाटकातील उच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी भगवी शाल आणि हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये सोमवारी मुस्लीम मुलीनी हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वादाला चांगलेच तोंड फुटले होते. महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालय राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधातील या याचिकेवर आज, मंगळवारी सुनावणी आहे. या पार्श्‍वभूमीवर महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे फेटे घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर कलम 144 लागू
शिमोगा येथे मंगळवारी सकाळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कलम 144 लागू करण्यात आले आहे. या घटनेवर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी जोरदार टीका केली आहे. कर्नाटकमधील काही शैक्षणिक संस्थांची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, एका ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावण्यात आला आहे. मला वाटतं, या संस्थांना शिक्षा व्हायला हवी. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी हे एक आठवडा बंद ठेवून ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवता येईल, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

तीन दिवस राहणार शाळा-कॉलेज बंद
हिजाब बंदीचे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेले असून त्यावर आता सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी राज्यातील राजकारण देखील तापले आहे. यात एकूणच शैक्षणिक वातावरण गढूळ झाल्याचे चित्र आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत म्हटले की, मी सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच शाळा आणि कॉलेजचे व्यवस्थापन करणार्‍यांना तसेच कर्नाटकच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की, त्यांनी शांतता आणि सौहार्द राखावे.

COMMENTS