नात्याला काळिमा…भावजयीवर अत्याचार, गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नात्याला काळिमा…भावजयीवर अत्याचार, गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : दीर-भावजयीच्या भावा-बहिणीसारख्या असलेल्या नात्याला काळिमा फासण्याचे काम एकाने केले आहे. भावजयीचे अपहरण करून धमकी देत तिच्यावर अत्

एकल समितीच्या कामाचा महिला आयोगाने केला गौरव
हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

अहमदनगर/प्रतिनिधी : दीर-भावजयीच्या भावा-बहिणीसारख्या असलेल्या नात्याला काळिमा फासण्याचे काम एकाने केले आहे. भावजयीचे अपहरण करून धमकी देत तिच्यावर अत्याचार करणार्‍य दिराविरोधात विवाहितेने पोलिसांत तक्रार केली आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका गावाच्या वाडीवर वास्तव्यास असलेले कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. पीडित महिलेचे पती व सासरे हे मोलमजुरी करण्यासाठी जातात. काही दिवसांपूर्वी दुपारी पीडित महिलेचा दीर घरी आला आणि पीडितेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत राहत्या घरात तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर सर्वांना जीवे मारण्याची धमकी तिला दिली. दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पीडिता व तिची सासू कांदा खुरपणी करण्यासाठी मजुरीने गेले असता, दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादीचा दीर मोटारसायकलवरुन आला आणि त्यांना सांगितले की, घरी बचत गटाचे अधिकारी आले आहेत, त्यासाठी तुला घरी यावे लागेल, असे म्हणत त्याने तिला त्याच्याकडील मोटारसायकलवर बसण्यास सांगितले व त्यानंतर मोटारसायकल घराकडे जाणार्‍या रस्त्याने न घेता दुसर्‍या रस्त्याने नेऊन पीडितेस जीवे मारण्याची धमकी देऊन श्रीगोंदा, चिंभळा मार्गे न्हावरा (ता. शिरुर, जि.पुणे) येथे नेले. तेथे त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पायातील चांदीचे जोडवे एका दुकानामध्ये 4 हजार 600 रुपयास विकले. त्यानंतर मोटारसायकलवर सायंकाळी स्वारगेट-पुणे येथे नेले. एका लॉजमध्ये रुम बुक केली. तेथे पीडितेवर त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर स्वारगेट (पुणे) येथून महिलेच्या नणंदेच्या घरी नेले. तेथे रात्रीच्या वेळी पीडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या नणंदेला सांगितला. यावेळी हा प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अपहरणासह महिला अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दिराच्या विरोधात दाखल केला आहे.

COMMENTS