खरवंडी येथे पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरवंडी येथे पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी : सोनईजवळील खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल

वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात
व्यक्ती मरते पण विचार कायम जिवंत असतात ः प्रा. किसन चव्हाण
बेल्हेकर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रवेश

अहमदनगर/प्रतिनिधी : सोनईजवळील खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. सोनई येथील खरवंडी रस्त्यापासून जवळच असलेल्या छत्रपती चौक परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका पडक्या घरात नम्रता शिवा शिंदे (वय 15) या अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची माहिती सोनई पोलिस ठाण्यास दिली. नम्रता हिने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार एच. एम. गर्जे करत आहेत.

COMMENTS