मुंबई पालिकेचा आश्‍वासनांचा अर्थसंकल्प

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंबई पालिकेचा आश्‍वासनांचा अर्थसंकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका आहे ती मुंबई. आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी नुकताच जाहीर केला. त्या पाठोपाठ मुंबई महानगर पा

देश सुरक्षा आणि हनी ट्रॅप
ओबीसी आरक्षणाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
विलीनीकरणानंतर सेवेची हमी कोण देणार?

आशिया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका आहे ती मुंबई. आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी नुकताच जाहीर केला. त्या पाठोपाठ मुंबई महानगर पालिकेचा जाहीर करण्यात आला. हा मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण ’शिवयोग केंद्र’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या अर्थ संकल्पात शिक्षण आणि आरोग्यावर केलेला सर्वाधिक खर्च हा तसा स्वागताचाच.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन 2022-2023 चा 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर, यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 17.70 टक्केची वाढ करण्यात आली. यंदा 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 2 हजार कोटी रुपये, असा अंदाजित केला होता. ते 14750 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात 12750 कोटी रुपये इतकी तरतूद 500 चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास 16,14,000 नागरिकांना मालमत्ता करामधून 100 टक्के सवलत देण्यात आली. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणार्‍या सवलतीची रक्कम 462 कोटी इतकी असेल. सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित उत्पन्न हे 7000 कोटींवरुन 4800 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ, तरी तिजोरीला मात्र गळती, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट, मालमत्ता करातून मिळणारं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या ’वापरकर्ता शुल्का’ची घोषणा, कचरा निर्मीती करणार्‍यांना भरावं लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले. मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात 56 टक्के वाढ करण्यात आली. 22646.73 कोटींचा भांडवली खर्च असून मुंबई अर्थसंकल्पात कलाकारांसाठी दोन नव्या योजना देण्यात आल्या आहेत. तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी ’युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म’, चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर हि मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईकरांना खार्‍या पाण्यातून गोडे पाणी मिळणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद करण्यात आली. खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील वाढत्या हवामान बदलांसाठीच्या कृती आरखड्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन 526 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद 1576 कोटींची करण्यात आली. नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 200 कोटी तरतूद असून दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. मुंबईतील नवे रस्ते तसेच, रस्ते सुधारणांकरता 2200 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबईतील 47 पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी 1576.66 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली. मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प हा तसा अभिनंदनीय. मुंबई महापालिकेचा 3370 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अशातच शैक्षणिक अर्थसंकल्पात मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु, ही घोषणा हवेत विरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

COMMENTS