Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यथा आणखी एका फाळणीस देशाला सामोरे जावे लागेल : माजी मंत्री अण्णा डांगे

इस्लामपूर / प्रतिनिधी : व्हाय आय किल्लड गांधी या चित्रपटाच्या निर्मितीला न्यायालयाने सामाजीक गढूळता टाळण्यासाठी अनुमती न देता बंदी घालावी. असेच आ

सातार्‍यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश
कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पद भरतीत प्राधान्य : ना. शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी

इस्लामपूर / प्रतिनिधी : व्हाय आय किल्लड गांधी या चित्रपटाच्या निर्मितीला न्यायालयाने सामाजीक गढूळता टाळण्यासाठी अनुमती न देता बंदी घालावी. असेच आता सर्वसाधारण समाजाचे मानस आहे. मी नथुराम बोलतोय या एकपात्री नाटकातून नथुरामच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले असले तरीही समाजाने ते समर्थन स्विकारले नाही. भडक डोक्याच्या माथेफिरूंच्या मतांना आपण असे महत्व देवून पुन्हा-पुन्हा त्याची उजळणी करत बसलो तर देशाच्या आणखी एका फाळणीला सामोरे जावे लागेल. अशा वातावरणाच्या निर्मितीस सर्व स्तरावर विरोध करून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करायला खा. शरद पवार यांनी अनुमती नाकारून नकार दिला ती त्यांना सुचलेली सुबुध्दी होय. कारण नाटकी पणाने का होईना मी नथुराम बोलतोय असे देवदुत असल्यासारखे गांधी हत्येचे समर्थन करणे हा नीचपणाचा कळसचं नव्हे काय? नथुरामच्या म्हणण्यात एक किंचितहि तथ्य असते तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फाशी का दिली. सर्वोच्च न्यायालयाची तेंव्हाची चुक म्हणायची का? नथुराम याने केलेल्या गांधी हत्येचे कोणत्याही स्तरावर कोणत्याही स्थितीत समर्थन होवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब डांगे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.

COMMENTS