मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच जातीव्यवस्था, तिचा उद्गगम आणि इतिहास या शोधनिबंधधात सर्वप्रथम जातीव्यवस्थेच्या उच

राज्यातील पर्यटनाच्या बलस्थानांवर काम होणे गरजेचे – पर्यटन तज्ज्ञ अमिताव भट्टाचार्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक… म्हणाले, भगवा ध्वज सामर्थ्य, बलिदानाचे प्रतीक
ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी दूर करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच जातीव्यवस्था, तिचा उद्गगम आणि इतिहास या शोधनिबंधधात सर्वप्रथम जातीव्यवस्थेच्या उच्चाटनाशिवाय भारतीय समाज प्रगती पथावर जाऊ शकत नाही, असे नि:संदीग्ध प्रतिपादन केले. त्यानंतर भारतात दाखल झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम आपल्या हातात एक स्वतंत्र भूमिका असणारे नियतकालिक असावे, ही भूमिका घेतली. या भूमिकेतूनच त्यांनी ज्या समाज समुहाला जातीव्यवस्थेने सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते, त्या समाजाचा आवाज या व्यवस्थेत कधी घुमलाच नव्हता अशा दबलेल्या जाती समुहांना आवाज देणारे नियतकालिकाच्या रूपात ‘ मूकनायक ‘ या पाक्षिकाचा प्रारंभ ३१ जानेवारी १९२० रोजी अधिकृतपणे केला. प्रातिनिधिक स्वरूपात हे मूकनायक म्हणजे तत्कालीन स्पर्श वंचित समाजाचा एक आवाज निर्माण केला. या प्रसंगाला एका लोककवी ने गीतातून शब्दबद्ध करताना म्हटले की, ” कालचे ते सारे मुके आज बोलू लागले,” असे सार्थ वर्णन केले. मूकनायक असे म्हणता येईल की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पहीला कृती कार्यक्रम होता. यावरून आपल्याला लक्षात घेता येईल की, प्रसारमाध्यमे किती महत्वाची आहेत. मूकनायकचा प्रारंभ करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओळी शिर्षकाच्या खाली अधोरेखित केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही कृती समतावादी संत चळवळीला आपल्या चळवळीचा आधार बनविला. ब्रिटिश काळात जातीव्यवस्था किती टोकाची होती, हे आपणांस भीमा-कोरेगावच्या इतिहासातून कळते. या जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावयाचे असेल तर त्यास भक्कम जनतळ असावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच हेरले होते. त्यामुळे त्यांनी मूकनायक चे  ब्रीद म्हणूनचं 
काय करुन आता धरुनिया भीड |नि:शक हे तोड वाजविले ||१||नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||
या अभंग ओळी सातत्याने ठेवल्या. मूकनायकच्या पहिल्या अंकातील अग्रलेख स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीला. एकूण तेरा अंक या पाक्षिकाचे प्रकाशित झाले. तत्कालीन समाज हा वारकरी समाज म्हणून अप्रत्यक्षपणे संघटीत होता. संत चळवळीचा समतावादी विचारांचा प्रभाव गावोगावी होता, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घेऊनच मूकनायक ची उभारणी केली गेली. या पाक्षिकासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी रूपये २५००/- चा धनादेश देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ऐतिहासिक कार्याला मदत केली होती. परंतु, शाहू महाराज यांनी केलेली ही आर्थिक मदत सहानुभूतीतून नव्हे तर एका व्यावहारिक भूमिकेतून घेतली होती. छत्रपती शाहू महाराज यांच्या समतावादी आणि परिवर्तनाच्या भूमिका आणि बहुजन समाजातील तेही खास करून मराठा समाजातील तरूणांना आपल्या राज्यात नोकरीची नियुक्ती दिल्याने संपूर्ण ब्राह्मण समाज त्यांच्या विरोधात षडयंत्र करू लागला होता. त्यातच टिळकांशी छत्रपती शाहू महाराज यांचा संघर्ष या सर्व विपरीत परिस्थितीत छत्रपती शाहू महाराज यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर एक भक्कम साथ मिळाली होती. या भूमिकेतूनच त्यांनी मूकनायक ला सढळ हाताने मदत केली. या ऐतिहासिक बाबीला आपण समजून घेणे फार गरजेचे आहे. आज मराठा समाज जे आरक्षण मागतोय त्याची प्रत्यक्ष सुरूवात छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती. परंतु, मराठा समाज लवकरच जातीच्या अभिनिवेशातून ब्राह्मणी छावणीचा घटक बनला. मूकनायकच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला जातीव्यवस्था निर्मूलनाचा लढा आणि राजकीय सत्तेत ब्राह्मणेतर समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात व्हावा, या भूमिकेतूनच मूकनायक चे लेखन झाले. आज मूकनायक ला १०२ वर्षे पूर्ण होत असताना ब्राह्मणेतर समाजाने हे वास्तव लक्षात घ्यावे! मूकनायक चा इतिहास समजून घेणे ब्राह्मणेतर समाजासाठी अनिर्वाय आहे. या शिवाय आम्हाला समाजाचे राजकीयकरण करता येणार नाही. ब्राह्मणेतरांच्या राजकीयकरणाच्या अभावाने आज प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. मूकनायक चा इतिहास समजून घेऊन संवैधानिक समता मजबूत करूया, हाच मूकनायक च्या वर्धापन दिनानिमित्त आपण निश्चय करूया.
(दखल)ReplyForward

COMMENTS