फोटो ओळी : रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करताना विद्यानिकेतनचे प्राचार्य अजित माळी. इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूलम
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये देशाच्या 73 व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून कोरोना संकटकाळात ज्या काळात कोरोना रुग्णांच्या जवळ जाण्यास कोण तयार नव्हते. अशा काळात आणि अजून देखील कोरोना रुग्णांची रुग्णालयातने आण करून त्यांना जीवन दान देणार्या आणि घरातील लोकांपेक्षा रुग्णांची जास्त काळजी घेणार्या रुग्णवाहिका चालक भगवान कांबळे, प्रकाश साबळे आणि शशिकांत पाटील यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरसिंह थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षकांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. तसेच समूहगीताचे सादरीकरण केले. प्रजासत्ताक दिनानिमत्त शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानिमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना शाळेचे प्राचार्य अजित माळी यांनी कोरोना योध्दे हेच या संकट काळातील खरे हिरो असल्याचे सांगितले आणि म्हणून त्यांनी केलेले कार्य देशासाठी दिलेले योगदान मानून आजच्या प्रजासत्ताकदिनी रुग्णवाहिका चालकांचा सन्मान करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले.
COMMENTS