शेतकर्‍यांच्या वीज बिलाच्या रकमेची ऊस बिलातून वसुली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या वीज बिलाच्या रकमेची ऊस बिलातून वसुली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा

पुणे/प्रतिनिधी : राज्यात साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची वीज बिलांच्या रकमेची वसुली त्यांच्याच ऊस बिलाच्या रकमेतून करण्यात येणार असल्याने, याविरोधात

चांदवड ला पुन्हा रास्ता रोको , शेतकरी रस्त्यावर  
अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना अटक
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

पुणे/प्रतिनिधी : राज्यात साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची वीज बिलांच्या रकमेची वसुली त्यांच्याच ऊस बिलाच्या रकमेतून करण्यात येणार असल्याने, याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या विरोधात जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी महावितरणच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांनी हे पाऊल उचलले आहे. तीन ते पाच हजार रुपये रकमेपर्यंत वसुली केली जाईल. त्या वरील रक्कम वसूल केली जाणार नाही. याला शेतकर्‍यांचा विरोध असेल तर कारखाने भूमिकेचा पुनर्विचार करतील., असे त्यांनी नमूद केले आहे. राज्यात वीज पुरवठा करणार्‍या महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. महावितरणने वीज बिलांची वसुली होण्यासाठी वेगवेगळे उपाय सुरू केले आहेत. त्यांनी साखर कारखान्यांना शेतकर्‍यांची वीजबिलांची वसुली बिलातून करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असताना त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. याची सुरूवात जवाहर साखर कारखान्याकडून सुरू झाली आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याबाबत जवाहर साखर कारखान्याची अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना सांगितले की, महावितरणने शेतकर्‍यांच्या वीज बिलातून कपात करून ही रक्कम भरावी अशा सूचना सर्वच साखर कारखान्यांना केल्या आहेत. यानुसार तीन ते पाच हजार रुपये पर्यंतची शेतकर्‍यांची रक्कम कारखाना स्वतःकडे ठेवणार आहे. या वसुलीला शासनाने संमती दिल्यानंतर ती महावितरणकडे भरली जाणार आहे. पाच हजार किंवा त्याहून अधिक मोठ्या रकमेची कपात करणार नाही, असे साखर कारखान्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS