पाकिस्तानचे वादळ नगरपर्यंत पोहोचले ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकिस्तानचे वादळ नगरपर्यंत पोहोचले ?

अहमदनगर/प्रतिनिधी : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात व अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळे मुंबईतील वाहनांवर ’प

जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोजमध्ये निषेध
मनपासमोर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन
यती नरसिंहानंद सरस्वतीविरोधात नगरमध्ये अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात व अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळे मुंबईतील वाहनांवर ’पांढरी चादर’ पसरली असून कोकणात अवकाळी पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या धुळीच्या वादळाने उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी असून, मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने व त्यात पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर सफेद डाग दिसत आहेत. दरम्यान, जुन्नर, पारनेरमार्गे हे वादळ थेट नगरपर्यंत येऊन पोहचले आहे. सध्या नगर शहरात आकाशात सर्वत्र धुरकट दिसत आहे. टोंगा बेटावर झालेल्या ज्वालामुखीनंतर हे वादळ तयार झाले आहे. श्‍वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS