Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्बंध घालून महाबळेश्‍वरसह पाचगणी परिसर पर्यटकांसाठी खुला

महाबळेश्‍वर / प्रतिनिधी : महाबळेश्‍वरसह पाचगणी या पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललॅण्ड व ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण

सातारा जिल्हा बँकेकडून कर्जे स्वस्त केल्याची घोषणा
गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी; मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे वक्तव्याने अडचणींत वाढ

महाबळेश्‍वर / प्रतिनिधी : महाबळेश्‍वरसह पाचगणी या पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललॅण्ड व ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व पर्यटकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. या निर्णयामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सुट्ट्यांनी दोन्ही पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात बहरणार आहेत.
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटविकास अधिकारी अरूण मरभळ, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, हॉटेल व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने पर्यटनस्थळे बंद केली होती. त्यामुळे महाबळेश्‍वर व पाचगणीतील विविध पॉईंटस् पर्यटनस्थळी शुकशुकाट होता.
पर्यटनस्थळे बंद झाल्याने यावर आधारित असलेले विक्रेते व्यापारी, व्यवसायिक, टॅक्सी-घोडे व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत व्यावसायिकांच्या शिष्यमंडळाने आ. मकरंद पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेत काही निर्बंध ठेऊन प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याबाबत विनंती केली. यावर जिल्हा पातळीवर काही निर्णय न झाल्याने आ. पाटील यांनी सचिव असीम गुप्ता यांची भेट घेत हा विषय मांडला. त्यानुसार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना गर्दीचा आढावा घेत पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकार्‍यांना याबाबत आदेशित केले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी शुक्रवारी हिरडा विश्रामगृहात विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह बैठक घेतली. त्यावेळी वेण्णालेक, ऑर्थरसीट पॉईंट, टेबल लॅण्ड ही प्रेक्षणीयस्थळे वगळता अन्य पर्यटनस्थळे खुली करण्यात आली. गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. तसेच पर्यटन स्थळांच्या परिसर सुरु केले म्हणून पयटकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जाधव यांनी केले.
महाबळेश्‍वरमधील लॉडविक पॉईंट, मुंबई पॉईंट, कॅनॉट पीक पॉईंट, विल्सन पॉईंट, प्लेटो पॉईंट किंग्स चेअर पॉईंट, लिंगमळा धबधबा तसेच प्रतापगड व तापोळा तर पाचगणी येथील पारशी पॉईंट सिडनी पॉईंट खुले करण्यात येणार आहेत. या पॉईंटवर प्रत्येकी 25 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. पॉईंटला भेट देण्यासाठी स्थानिक टॅक्सी संघटनेच्या कार्यालयाशी साधावा लागणार आहे. पर्यटकांनी पॉईंटवर जाण्यापूर्वी कार्यालयाची पावती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

COMMENTS