Homeताज्या बातम्याशहरं

राजारामबापू दूध संघाच्या अध्यक्षपदी नेताजीराव पाटील बिनविरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी नेताजीराव पाटील (रा. तांबवे) यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत पाटील (ठाणापु

चांदोली परिसरात अतिवृष्ठी सुरु; वारणा धरणातून विर्सग वाढविला
अहिल्यानगर : बाजरी, ज्वारी पिक कर्ज मर्यादेत वाढ : चेअरमन आ.कर्डिले
राजधानीतील शेतकर्‍यांचा मोर्चा तूर्तास स्थगित

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी नेताजीराव पाटील (रा. तांबवे) यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत पाटील (ठाणापुढे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेल्या दूध संघावर संचालक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या होत्या. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी संचालक प्रताप पाटील यांनी नेताजीराव पाटील यांचे नाव सुचविले. त्याला अनुमोदन संचालक संग्राम फडतरे यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी संचालक बबनराव सावंत यांनी शशिकांत पाटील यांचे नाव सुचवले. त्यास संचालक प्रशांत थोरात यांनी अनुमोदन दिले.
या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयराव पाटील, दूध संघाचे संचालक आणि कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS