अमेरिकेच्या मानबिंदूवर पुन्हा हल्ला

Homeदेशविदेश

अमेरिकेच्या मानबिंदूवर पुन्हा हल्ला

अमेरिकेच्या कॅपिटल हिल परिसरामध्ये एका कारने बॅरिकेडमध्ये घुसून दोन पोलिस अधिकार्‍यांना चिरडले.

समर्पित आयोगाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत लोणंदच्या कु. पायल जाधव हिस सुवर्णपदक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या कॅपिटल हिल परिसरामध्ये एका कारने बॅरिकेडमध्ये घुसून दोन पोलिस अधिकार्‍यांना चिरडले. एका अधिका्याचा मृत्यू झाला तर दुसर्‍यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कार चालकही जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या संसदेजवळील एका एका तपासणी नाक्यावर ही घटना घडली. अमेरिकन कॅपिटल (संसद भवन) बाहेर बॅरिकेड लावल्यामुळे कारचा चालक चाकू घेऊन बाहेर आला, त्यावर पोलिस अधिकार्‍यांनी त्याला गोळ्या घातल्या. 

 या घटनेत दोन पोलिस अधिकारीही जखमी झाले, त्यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेच्या धिंडोळे बाहेर आले. सिनेटच्या बाजूच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या 90 मीटर अंतरावर  ही घटना घडली. सध्या काँग्रेसला (संसद) सुट्टी आहे. अमेरिकचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक सशस्त्र जमावाने  संसद भवनावर हल्ला केला, त्यानंतर तीन महिन्यांनी ही घटना घडली. पोलिस अधिकार्‍यांनी मृत अधिकारी किंवा संशयित कार चालकाची ओळख उघड केलेली नाही. तसेच ही घटना दहशतवादाशी जोडलेली दिसत नाही. याशिवाय या घटनेतील सहभागींचा सहा जानेवारीच्या हिंसाचारात कोणताही सहभाग दिसून येत नाही. या घटनेनंतर कॅपिटल परिसराची नाकेबंदी करण्यात आली. कर्मचार्‍यांना आत प्रवेश करण्यास मनाई केली गेली. पोलिस कर्मचारी विल्यम बिली इव्हान्सच्या निधनानंतर व्हाईट हाऊसचा ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व त्यांच्या पत्नीने या घटनेवर दुख व्यक्त केले आहे.

या भागात झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी अमेरिकेची संसद बंद ठेवली आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये जमावाने प्रवेश केल्याने झालेल्या गोंधळाच्या आठवणी या घटनेने जागविल्या. बायडेन म्हणाले, की संसद भवनासमोर मैदानावरील सुरक्षा चौकीवर झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे जिल आणि मी मनापासून दु: खी झालो आहोत.

COMMENTS