उत्तरप्रदेशात भाजपला गळती

Homeताज्या बातम्यासंपादकीय

उत्तरप्रदेशात भाजपला गळती

काही दिवसांवर उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असतांनाच, या राज्यात भाजपला गळती लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आठ आमदारांसह कॅबीनेट मंत्री

सत्तासंघर्षात शिंदे गटाची गोची
लोकप्रियतेचा दुसरा अर्थ
दहशतवादाची पाळेमुळे

काही दिवसांवर उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असतांनाच, या राज्यात भाजपला गळती लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आठ आमदारांसह कॅबीनेट मंत्री असलेले प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला. यामुळे पुन्हा एकदा भाजपचेच मंत्री आणि आमदार योगी आदित्यनाथ यांच्या कारभारवर नाराज असल्याचे चित्र आहे.
उत्तरप्रदेशात मागासवर्गीय लोकसंख्या आणि मुस्लीम लोकसंख्या मोठया प्रमाणावर आहे. असे असतांना, या वर्गाच्या विकासासाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. कधी नव्हे तर भाजपला उत्तरप्रदेशातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपकडून मोठया अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र अपेक्षा पूर्ण करण्यात योगी आदित्यनाथ अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. उत्तरप्रदेशातील बलात्कारांच्या घटनांनी तर हे राज्य चांगलेच हादरल्याचे दिसून आले. त्यानंतर लखीमपूर खेरी प्रकरणांवरून तर भाजपची देशभर नाचक्की झाली. या घटनांवरून भाजपची उत्तरप्रदेशातील प्रतिमा चांगलीच खालावल्याचे दिसून येत आहे. शिवाय भाजपला आव्हान देणारा तगडा उमेदवार कुणी नसला, तरी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच संपूर्ण उत्तरप्रदेश पिंजुन काढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अखिलेश यांना मोठया प्रमाणावर प्रचार करण्याची आवश्यकता उरलेली नाही. या तुलनेत मायवती यांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे, प्रभावीपणे रुजवण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. विविध सभा, संमेलने, सोशल मीडियामध्ये मायावती या अजूनही उतरलेल्या नाहीत. तर दुसरीकडे काँगे्रस हा फक्त काही शहरातील विशिष्ठ वर्गांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात काँगे्रसला अच्छे दिन येतील, ही अपेक्षा देखील सपशेल अपयशी ठरतांना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ यांना जर कडवी टक्कर कोण देऊ शकतो, तर ते अखिलेश यादव, याची जाणीव भाजप नेत्यांना देखील आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज आमदार आणि नेते यांनी सपाची वाट धरली आहे. तर भाजपमधील ही गळती रोखण्याचे मोठे आवाहन भाजप नेत्यांसमोर आहे. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजापाला सोड चिठ्ठी देत सपामध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणारे आमदार ब्रजेश प्रजापती, रोशनलाला वर्मा आणि भगवती सागर हे देखील सपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजीनामा देताना आमदार रेशन लाल यांनी म्हटले आहे की, मी गेल्या पाच वर्षांपासून भाजपाचा आमदार आहे. मात्र मी माझ्या मतदारसंघातील विविध समस्या राज्य सरकारसमोर मांडल्या परंतु त्या सोडवण्यासाठी कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर बोलताना उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, घाईने घेतलेला कुठलाही निर्णय हा चुकीचा ठरतो, स्वामी प्रसाद मौर्य यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे मला माहित नाही. मात्र त्यांनी खूप घाईत निर्णय घेतला आहे. मात्र यानिमित्ताने भाजपला लागलेली गळती थांबणार नसल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे, भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, या पक्षाचे केंद्रात सरकार आहे. अशा परिस्थितीत भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पक्ष आपल्या नेत्यांना विशिष्ठ पदावर सामावून घेऊ शकतो, याची जाणीव असतांना देखील भाजपमधील कॅबिनेट मंत्री, आमदार जर पक्ष सोडत असेल, तर त्यांना भाजप सत्ता गमावू शकतो, याची चाहूल लागल्यामुळेच त्यांनी पक्षबदल केला असण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी सपाच्या अनेक आमदार आणि नेत्यांच्या घरांवर छापे टाकत त्यांना जेरीस आणले आहे. अशा परिस्थितीत जर इतक्या मोठया संख्येने आमदार आणि मंत्री भाजपमधून बाहेर पडत असेल तर भाजपसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.

COMMENTS