राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात थंडी कमी झाली होती, मात्र कालपासून पुन्हा एकदा थंड हवेला सुरूवात झाली असून, आगामी दोन-तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्य

तरुणाकडून कुटुंबातील नातेवाईंकावर हल्ला ; दोघांचा मृत्यू | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24
थेट भरती अखेर यूपीएएसीकडून रद्द
सांगली : गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी राज्यसरकार सुप्रीम कोर्टात जाते | LokNews24

मुंबई : राज्यात थंडी कमी झाली होती, मात्र कालपासून पुन्हा एकदा थंड हवेला सुरूवात झाली असून, आगामी दोन-तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीर आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्यामुळे तापमानातही घट होणार आहे. उत्तरेकडे सरकणार्‍या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणार्‍या आर्द्र वार्‍यांमुळे 11 ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर-पश्‍चिम आणि मध्य भारतात हलका पाऊस अपेक्षित आहे.
11 जानेवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल. तसेच गारा पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यभरात हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्यानुसार पुढील तीन-चार दिवस असेच राहणार आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथील हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या भागात हलका पाऊस अपेक्षित आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील या भागात पुढील दोन-तीन दिवस पाऊस पडल्यानंतर तापमानात झपाट्याने घट होऊन थंडी वाढेल. मराठवाड्यातही अनेक भागांत हवामानाचा कल असाच राहील. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढणार आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पिके सडल्याने शहरांतील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरांमध्ये कांदा आणि भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवामानही झपाट्याने बदलत आहे. शनिवारी येथे अवकाळी पाऊस झाला. रविवारी आकाश निरभ्र झाले. रविवारी दुपारी वातावरण दमट होते. सोमवारी तापमानात अचानक घट झाली. सोमवारी मुंबईत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.

COMMENTS