Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक संशोधन यादीत डॉ. अभिजीत कदम

कराड / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सच्या रसायनशास्त्र विभागाचा विद्यार्थी आणि पुसेसावळी, ता. खटाव येथील डॉ. अभिजीत कदम दक्षिण कोरिय

भारत अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार (Video)
फेसबुक-इन्स्टावर ब्लू टीकसाठी पैसे
महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश

कराड / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सच्या रसायनशास्त्र विभागाचा विद्यार्थी आणि पुसेसावळी, ता. खटाव येथील डॉ. अभिजीत कदम दक्षिण कोरियातील गाचोन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावाची गणना जागतिक क्रमवारीत सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये झाली आहे. ही क्रमवारी स्कोपस प्रकाशन डेटा वापरून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तज्ञाच्या सहाय्याने करण्यात आली आहे.
स्कोपस हे संशोधकांना संशोधन लेख उपलब्ध करून देणारे जगातील सर्वात मोठे डेटाबेस आहे. क्रमवारी बनवताना प्रामुख्याने शोधनिबंध, एच इंटेक्स, आय टेन इंटेक्स, सायटेशन, पेटंट इत्यादी निकषांचा आढावा घेतला जातो. त्या जागतिक क्रमवारीमध्ये स्वतःचा ठसा उमटविणारे डॉ. कदम यांनी प्राथमिक शिक्षण पुसेसावळी येथील महात्मा गांधी विद्यालयात तर पदवीचे शिक्षण कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समधून आणि पदव्युत्तर व पीएचडी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून सन 2015 मध्ये पूर्ण केली. त्यानंतर जगातील नामांकित दक्षिण कोरीयातील हान्यांग विद्यापीठात ते पोस्ट डॉक्टर संशोधक म्हणून त्यांनी काम केले. सन 2017 पासून ते सहाय्यक प्राध्यापक या पदावर डिपार्टमेंट ऑफ केमिकल अ‍ॅण्ड बायोलॉजिकल इंजिनिअरिंग येथे कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण कोरिया सरकारने एक कोटीचा निधी त्यांच्या पुढील संशोधनासाठी मंजूर केला आहे.
10 वर्षांपासून त्यांनी मटेरियल सायन्स मधील फोटोकॅटलिजिस, हायड्रोजन एनर्जी, बॅटरी सुपर कॅपॅसिटर आणि सेन्सिंग यात संशोधन केले आहे. त्यांचे 60 पेक्षा जास्त शोधनिबंध जागतिक स्तरावर प्रसिध्द झाले आहेत. चाळीसहून अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. डॉ. कदम यांचे वडील केळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या यशाबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च शिक्षण मंडळाचे सचिव प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एच. बुरुंगले व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS