प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : एसटी बस प्रवास भाड्यात सवलतीसाठी अपंगत्वाचे (दिव्यांगत्व) बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल

आमदार प्रा. राम शिंदेंनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
मारुती व्हॅनसह शितपेय चोरणारे 12 तासात मुद्देमालासह जेरंबद 

अहमदनगर/प्रतिनिधी : एसटी बस प्रवास भाड्यात सवलतीसाठी अपंगत्वाचे (दिव्यांगत्व) बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन अशी फसवणूक करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबतची माहिती अशी की समाज कल्याण विभागचे (जिल्हा परिषद, अहमदनगर) सहायक सल्लागार दिनकर भाऊराव नाठे (वय 42, रा. चेडे हॉस्पिटल समोर, पाण्याच्या टाकी जवळ, येवले निवास, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. मूळ राहणार मु पो.पेठ, ता पेठ, जिल्हा नाशिक) हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर येथे चार वर्षापासून सहाय्यक सल्लागार या पदावर नोकरी करीत आहेत. त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकीत्सक (जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर) यांच्याकडील 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळण्याबाबत ओळखपत्र देण्याचे काम आहे. या तपासणीच्यावेळी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन चौघांनी शासनाचे फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. दि. 2 मे 2018 रोजी ते ड्युटीवर समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर येथे हजर असताना विक्रम विष्णुकांत राठी (रा.कोपरगाव, ता. कोपरगाव, जि नगर), विश्‍वनाथ ग्यानदेव फाळके (रा.निंबोडी, ता. कर्जत, जि. नगर), महेश दशरथ मते (रा.सावेडी, ता.-जि. नगर) व सुनूल खंडु पवार (रा.सुरेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) या चौघांनी त्यांच्याकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळण्याबाबत ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज व त्यासोबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र, त्या व्यक्तींनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावरील सही व हस्ताक्षर यामध्ये मला तफावत दिसून आल्याने त्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी ते प्रमाणपत्र ठेवून घेऊन त्याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कार्यालयास पत्रव्यवहार करुन, संबंधित प्रमाणपत्र त्यांनी दिले, अगर कसे? याबाबत माहिती विचारली असता त्यांनी ते प्रमाणपत्र दिल्याबाबत नोंद नसल्याचे कळविले.
त्यानंतर नाठे यांनी हे प्रकरण सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पुणे कार्यालयात पाठविले. या कार्यालयाकडून जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांना संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत आदेश झाले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाने याबाबत तक्रार देण्याचे नाठे यांना आदेश दिले आहे. यावरून नाठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र बनवून त्याद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास भाड्यात सवलत मिळण्याबाबत ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करुन सवलत मिळविण्याचा प्रयत्न केला व सरकारची फसवणूक केल्याबद्दल या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

COMMENTS