मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव उपनगरातील मोहिनीनगर येथे चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व साड्या असा एकूण 16 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

आत्मकेंद्री लोकशाहीमुळे अनागोंदी व भ्रष्टाचार पोसला गेल्याचा आरोप
जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर
कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव उपनगरातील मोहिनीनगर येथे चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व साड्या असा एकूण 16 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि.27 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
शकुंतला पंडितराव कुलकर्णी (रा.दत्त मंदिराजवळ, मोहिनीनगर, केडगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. घर बंद करून कुलकर्णी कुटुंब गावाकडे (मांडवे, ता. नगर) येथे गेले होते. सोमवारी (दि.3) रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी शकुंतला कुलकर्णी व त्यांचा मुलगा विजय हे दोघे मांडव्याहून मोहिनीनगर (केडगाव) येथील घरी आले. त्यांनी स्वयंपाक खोलीत प्रवेश करून पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. स्वयंपाक खोलीच्या एका दरवाजाची फळी उचकटलेली दिसली. घरातील लोखंडी पेटीतील रोख रक्कम व साड्या दिसून आल्या नाहीत. 15 हजाराची रोख रक्कम व 15 नऊवारी साड्या असा एकूण 16 हजार 500 रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल ईखे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS