Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यातील 13 हजार मुलांचे लसीकरण होणार

शाळांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण; पहिल्या दिवशी 1300 मुलांचे लसीकरण गोंदवले / प्रतिनिधी : राज्य शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलां

महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी : ना. रामराजे नाईक-निंबाळकर
कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू
कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध; व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची निवड

शाळांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण; पहिल्या दिवशी 1300 मुलांचे लसीकरण

गोंदवले / प्रतिनिधी : राज्य शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने सोमवारी माण तालुक्यातील 15 ते 28 वयोगटातील कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शाळेवर व केंंद्रावर सुरू झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी दिली आहे.
माण तालुक्यात 15 वर्षावरील एकूण 13 हजार मुलांची संख्या आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी 1300 मुलांना लसीकरण केले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात लसीकरण्याच्या दृष्टीने ऑनलाईन व केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविडशील्ड दोन्ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी 1300 मुलांना लसीकरण केले आहे.
कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. त्यावेळी सर्वप्रथम कोव्हीड काळात कर्तव्य बजावणार्‍या सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर 60 वर्षावरील वयोवृध्दांना लस देण्यात आली. टप्प्या-टप्प्याने 45 ते 18 वर्ष वयोगटाला देण्यात सुरुवात झाली. मध्यंतरी कोव्हीडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लस टोचून घेण्यासाठी दुर्लक्ष केले. प्रशासनाला लसीकरणाची गती वाढवण्याकरिता मोठी कसरत करण्याची वेळ आली होती. तरीही लसीकरणाची गती वाढ शक्य झाली नाही. यासाठी रेशन व पेट्रोल मिळणार नाही. अशी घोषणा करावी लागली. तसेच प्रत्येक गावागावात आरोग्य विभागाने लसीकरणाची शिबिरे आयोजित केली होती.
कोव्हीड-19 च्या व ओमिक्रॉन या नव्या व्हेंरीएंटने दहशत पसरवली आहे. आता लसीकरणा शिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लस देण्यासाठी हिरवा झेंडा दाखविला आहे. या निर्णयानुसार माण तालुक्यात सोमवार, दि. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील एकूण 1300 हजार मुलांना कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेवर व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण चालू ठेवण्यात येणार आहे. तर तालुक्यात सुरुवातीला तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
यानंतर टप्प्या-टप्प्याने 15 वर्षावरील मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नोंदणी रजिस्ट्रेशनची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 18 वर्षे वयोगटातील नागरिकांनासाठी सध्या केंद्रावर लसीकरण करून घेता येणार आहे. त्यामुळे इतर नागरिकांना लस घेण्यासाठी कुठलीही गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आरोग्य विभागाला सांगण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसात लसीकरण गती मिळाली आहे. तरीही लस न घेतलेल्या पहिला आणि दुसरा डोस त्वरित घ्यावा. सोमवार, दि. 3 जानेवारी 15 वर्ष पुढील मुलांना लसीकरण सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नियोजन झाले आहे. तरी इच्छुकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी आवाहन केले आहे.

COMMENTS