पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’
कोल्हापुरात आघाडीने गड राखला ; कॉंग्रेसच्या जयश्री पाटील विजयी
Solapur : वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल ३६ तासाने सापडला (Video)

नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाची किंमत कमी होईल, तेव्हा ग्राहकांना पूर्ण लाभ देण्याचे वचन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. जागतिक बाजारात कच्चे तेल प्रतिपिंप 63 डॉलरवर आले आहे. मोदी सरकारच्या काळात मध्ये कच्चे तेल 41 टक्के स्वस्त झाले; परंतु  पेट्रोल आणि डिझेल महागले. कच्च्या तेलाच्या किंमतींचा थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम होतो. मे 2014 मध्ये जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रतिपिंप 106.85 डॉलर होती. आता ती प्रतिपिंप 63 डॉलर आहे. असे असूनही पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी ते प्रतिलिटर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. 

या वर्षी इंधनाच्या किंमती 26 वेळा वाढल्या आणि तीन वेळा कमी झाल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जानेवारीत दहा वेळा आणि फेब्रुवारीमध्ये 16 वेळा वाढले आहेत, तर मार्चमध्ये किंमती स्थिर आहेत. 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 26 पट वाढ झाली आहे. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोल 7.36 रुपयांनी तर डिझेल 7.60 रुपये प्रति लिटर महागले आहे. तथापि, मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा खाली आल्या आहेत. या वेळी पेट्रोल 0.61 पैसे आणि 0.60 पैशांनी डिझेल स्वस्त झाले आहे. गेल्या सात वर्षांत गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली. एक मार्च 2014 रोजी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती, ती आता 809 रुपये झाली आहे. मोदी सरकारने पेट्रोलवर तीन वेळा तर डिझेलवर सात वेळा उत्पादन शुल्क वाढविले. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर केंद्र सरकार एक लिटर पेट्रोलवर 10.38 रुपये आणि डिझेलवर 2.22 रुपये कर आकारत असे. अबकारी कर म्हणून हा कर आकारला जातो. उत्पादन शुल्कात मोदी सरकारमध्ये 13 वेळा वाढ केली. एक लीटर पेट्रोलवर अबकारी शुल्क 32.90 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये आकारले जाते. 

COMMENTS