नवी दिल्ली : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला खराब हवामान कारणीभ
नवी दिल्ली : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला खराब हवामान कारणीभूत असून त्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, असा निष्कर्ष चौकशी समितीच्या अहवालातून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपरोक्त हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास करण्यासाठी हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात वरील खुलासा करण्यात आला आहे. तपास समितीने अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. सदर चौकशीवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अहवाल कायदा विभागाकडे पाठवला आहे. त्यानंतर अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, सदर अहवालाबाबत वायुसेनेच्या वतीने कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
COMMENTS