पश्‍चिम बंगालमध्ये आजपासून शाळा-कॉलेज, सलून, मॉल्स बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिम बंगालमध्ये आजपासून शाळा-कॉलेज, सलून, मॉल्स बंद

कोलकाता/वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्ण वाढ मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे विविध राज्यांकडून उपाययोजना होत असतांनाच, पश्‍चिम बंगलामध्ये मुख्यमंत्री

संघर्ष धान्य बँकेकडून के.प्रा.शा वसाहत बाग पिंपळगाव येथील शाळेत चार हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप
राजकारणाचे बाजारीकरण
ऑपरेशन नंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड

कोलकाता/वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्ण वाढ मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे विविध राज्यांकडून उपाययोजना होत असतांनाच, पश्‍चिम बंगलामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे सोमवारपासून शाळा, कॉलेज, माल्स, सलून बंद राहणार आहेत.
मागील काही दिवस पश्‍चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा, कॉलेज, विद्यापीठ, स्पा सेंटर, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर, मनोरंजन पार्क आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोमवारपासून सर्व सरकारी आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेनेच सुरु राहिल. प्रशासनाच्या सर्व बैठका व्हिर्चुअलही होतील, असे पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विेदी यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने दिल्ली आणि मुंबईहून येणार्‍या विमानांना आठवड्यातून दोनदाच उड्डाण करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन प्रकारांची सर्वाधिक प्रकरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर, कोलकाता ते ब्रिटनचे साप्ताहिक विमान याआधीच रद्द करण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर सद्यस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणारा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनी सांगितले की, बंगालमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उद्यापासून बंद राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत कमी असेल.

COMMENTS