राठोडांचा हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच भावला : विरोधी पक्ष नेते फडणवीसांचे गौरवोदगार, परिवाराची घेतली भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राठोडांचा हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच भावला : विरोधी पक्ष नेते फडणवीसांचे गौरवोदगार, परिवाराची घेतली भेट

अहमदनगर/प्रतिनिधी ः युतीच्या काळात नगरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये समन्वय साधून अनेक संस्थांवर युतीचे वर्चस्व माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांनी निर

पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे
मनामनात श्रीराम भक्तीची ज्योत पेटवा – प्रदीप महाराज नलावडे

अहमदनगर/प्रतिनिधी ः युतीच्या काळात नगरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये समन्वय साधून अनेक संस्थांवर युतीचे वर्चस्व माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांनी निर्माण केले. त्यांचा हिंदुत्वाचा मुद्द हा नेहमीच मला भावला. लोकांमध्ये राहून लोकांची काम करणारे स्व.अनिलभैय्यांचे लोकाभिमुख नेतृत्व होते, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले. फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच राठोड परिवाराची भेट घेतली. यावेळी श्रद्धांजली वाहताना (स्व.) राठोडांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
शिवसेना उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या निवासस्थानी विरोधीपक्ष नेते फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भेट देऊन राठोड परिवाराशी चर्चा केली. यावेळी विक्रम राठोड, प्रा.राम शिंदे, आ.गिरीश महाजन, आ.राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, परेश लोखंडे, योगीराज गाडे, शशिकांत देशमुख, गौरव ढोणे, शैलेश मुनोत आदी उपस्थित होते. स्व.अनिलभैय्या यांनी नेहमीच लोकांचा विचार केला, जनसमान्यांमध्ये राहून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. 25 वर्षे आमदार म्हणून त्यांनी मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावली. विधानसभेत ते नेहमी आपल्याकडे जनतेच्या कामांसाठी पाठपुरावा करीत, असे फडणवीस म्हणाले. यावेळी विक्रम राठोड यांनी (स्व.) राठोड यांच्या कार्याची माहिती दिली. भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील, प्रा. शिंदे, आ. महाजन आदींनी स्व.राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.यानंतर शिवालय येथे फडणवीस यांनी (स्व.)अनिल राठोड यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण केला. यावेळी दत्ता जाधव, मदन आढाव, महेश शेळके, सचिन राऊत, मनोज चव्हाण, मंदार मुळे, सत्यम मुथा, बाबालाल गांधी, संतोष गांधी, सुमित धेंड, महेश राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

त्याचा तारांकित प्रश्‍न करणार
येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी राठोडांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेतेफडणीस यांची भेट घेऊन नगरच्या आ.संग्राम जगताप यांच्याविषयी तक्रार केली. त्यांनी आयटी पार्कची उभारणी न करता आयटी पार्क असल्याचे भासवून नगरच्या जनतेची व तरुणांची कशी दिशाभूल केली, याविषयी फडणवीस यांना वस्तुस्थिती सांगितली व निवेदन दिले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, हा गंभीर विषय असून तुमच्याजवळ जे पुरावे आहे, ते मला पाठवा. त्याविषयी उच्चस्तरीय चौकशी लावण्याची मागणी आम्ही करू तसेच पुढील अधिवेशनामध्ये हा तारांकित प्रश्‍न उपस्थित करून आ. जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करू, असे आश्‍वासन दिल्याचे भांबरकर यांनी सोशल मिडियाद्वारे सांगितले आहे. तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी त्यांचा अनमोल वेळ मला दिला त्याबद्दल मी त्यांचे व विक्रम राठोड यांचे आभार मानतो, असेही आवर्जून स्पष्ट केले आहे.

COMMENTS