मुंबईसह दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट धडकली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईसह दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट धडकली

ओमायक्रॉनचा समुह संसर्गामुळे चिंतेत वाढ

मुंबई/नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येचा आकडा झपाटयाने वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली असून, मुंबई, दिल्ली आ

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल
ओझर नगरपरिषदेस पुर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा  
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना

मुंबई/नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येचा आकडा झपाटयाने वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली असून, मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकल्याचे देखील कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी मान्य केले आहे.
मुंबईसह पुण्यात देखील ओमायक्रोनच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात तर तब्बल 900 रुग्ण पुणे शहरात आढळून आले, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.काल देखील राज्यात ओमायक्रोनचे 85 रुग्ण आढळून आले. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले.

महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. पंडित यांनी सध्याचा ट्रेन्ड पाहता याला कोरोनाची तिसरी लाट म्हणता येईल असे म्हटले आहे. ते म्हणाले, डॉक्टर म्हणून मी हेच सांगू इच्छितो की, लोकांनी कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत. तसेच जर त्यांना कोरोनाची लक्षण असतील तर त्यांनी कुठलीही लाज न बाळगता आपली चाचणी करुन घेतली पाहिजे. जर कोरोनाच्या संसर्गामुळं आरोग्य व्यवस्थेत मोठा ताण यायला लागला तरच सरकारकडून लॉकडाऊन लावला जाईल, तोपर्यंत लॉकडाउन लागू होणार नाही. त्यामुळे लॉकडाउन टाळायचा असेल तर लोकांनी नियमांचे पालन करायलाच हवे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, अनेक जण विचारताहेत की रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यामागचा हेतू काय? त्यावर स्पष्टीकरण देताना डॉ. पंडीत म्हणाले, ही संचारबंदीला मोठे तार्किक महत्व आहे. सध्याच्या काळात लोकांनी खूपच सजग राहिले पाहिजे हाच संदेश यातून दिला जात आहे.
दरम्यान, कुठेही प्रवास न केलेल्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होत आहे. याचा अर्थ असा की ओमायक्रॉन हळूहळू पसरू लागला असल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे. दिल्लीतील रुग्णालयांत 200 रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील 102 आणि बाहेरील 98 रुग्णांचा समावेश आहे. 200 पैकी 115 रुग्णांनी कसलीही लक्षणे नाहीत. पण खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे जैन यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील आतापर्यंत आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या 961 रुग्णांपैकी 320 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत 263, महाराष्ट्रात 252, गुजरात 97, राजस्थान 69, केरळमध्ये 55 रुग्ण आढळून आले आहेत.

COMMENTS