कोपरगाव प्रतिनिधी :- पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जा
कोपरगाव प्रतिनिधी :- पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून आगामी काळात शहराचा नक्कीच कायापालट होईल अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली. वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करणे, पंचायत समिती ते आठरे बंगला रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व योगेश कोपरे घर ते पंचायत समिती गुरुद्वारा रोडपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, इतर शहराच्या तुलनेत कोपरगावचा देखील विकास होणे गरजेचे आहे. मात्र कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या आजही जैसे थे आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मागील निवडणुकीत झालेली चूक सुधारून राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन केले. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून ओमायक्रॉनचे देखील रुग्ण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आजपर्यंत कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जे सहकार्य व जो संयम दाखविला तेच सहकार्य व संयम ठेवावा असे आवाहन करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, सौ. रेखा जगताप, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, अॅड.विद्यासागर शिंदे, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, कैलास ठोळे, राजेंद्र ठोळे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, बाळासाहेब सोनटक्के, सुनील साळुंके, डॉ. आप्पासाहेब आदिक, नारायण लांडगे, ऋषिकेश खैरनार, इम्तियाज अत्तार, गणेश लकारे, मुकुंद इंगळे, दिनेश पवार, एकनाथ गंगुले, दिनेश संत, विकी जोशी, विकास बेंद्रे, मनोज नरोडे, योगेश नरोडे, रवींद्र राऊत, महेश उदावंत, निलेश डांगे, आकाश रोहोम, राजेंद्र जोशी, कुलदीप लवांडे, शुभम लासुरे, राहुल राठोड, पप्पू गोसावी, विजय त्रिभुवन, संतोष बारसे, किरण बागुल, विजय आढाव, सागर लकारे, विजय दाभाडे, श्रेणीक बोरा, बापू वढणे, रोहित वाघ, संजय भोकरे, प्रकाश गवारे, बाळासाहेब नरोडे, योगेश वाणी, संतोष शेजवळ, संतोष शेलार, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, मायादेवी खरे, दिक्षा उनवणे, उषा उदावंत, भाग्यश्री बोरुडे, शितल लोंढे, साक्षी झगडे, शितल वायखिंडे, सुषमा पांडे, मीरा साळवे, जय बोरा, अखिल चोपदार, चांदभाई पठाण, मुन्ना पठाण, रोहीत खडांगळे, मुकुंद भुतडा, हारुण शेख, रविंद्र देवरे, सुनील साळुंके, अमित आगलावे, संजय बोराडे, बिलाल पठाण, जाकीर शेख, शिवाजी कुऱ्हाडे, बाबुराव पवार, विकास पांढरे, आकाश काकडे, राजेंद्र हाबडे, शंकर घोडेराव, अभिषेक कोकाटे, ऋषिकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS