शहरी भागातील शिक्षकांनी जाणून घेतले दिल्ली मॉडेल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरी भागातील शिक्षकांनी जाणून घेतले दिल्ली मॉडेल

राज्यातील 81 शिक्षकांचा सहभाग, दिल्लीतील शिक्षण पद्धतीचा केला अभ्यास

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील नगरपालिका वा मनपा असलेल्या शहरी भागातील शाळांतील शिक्षकांनी दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल नुकतेच जाणून घेतले. नगरपालिका, महान

*LokNews24! देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट
शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील नगरपालिका वा मनपा असलेल्या शहरी भागातील शाळांतील शिक्षकांनी दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल नुकतेच जाणून घेतले. नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघाच्यावतीने राज्याध्यक्ष अर्जून कोळी यांनी राज्यातील निवडक 81 शिक्षकांचा दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा नुकताच केला व तेथे दिल्लीतील मॉडेल स्कूल पाहणी व डायट दिल्ली यांच्याकडून या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांनी दिल्लीतील मॉडेल स्कूलला भेट देऊन व तेथील प्रशिक्षणात सहभाग घेऊन नगरपालिका-महानगरपालिका शिक्षकांचा दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वी केला. यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे स्वीय सहाय्यक डॉ.बिपीन पांडे यांचे विशेष सहकार्य मिळाले. भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या दिल्ली शिक्षण पध्दतीने भारतीयांसह परदेशी शिक्षक व शिक्षणतज्ञांना भुरळ घातली आहे. दिल्लीमध्ये झालेली ही शैक्षणिक क्रांती अभ्यासण्यासाठी महाराष्ट्रातील विविध नगरपालिका व महानगरपालिका शाळेत शिकवणारे 81 शिक्षक स्वखर्चाने दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौर्‍यावर गेले होते. यात नगर मनपाच्या केडगाव शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांचाही सहभाग होता. गेल्या 6-7 वर्षापासून सुरू असलेल्या दिल्ली शैक्षणिक बदलाचा अभ्यास करणे व दिल्ली डायट येथे शैक्षणिक प्रशिक्षण घेणे यासाठी हा चार दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर होताना राबविले जात असलेले विविध नवोपक्रम, विविध स्तरांवरील संरचना, जिल्हा शाळा रचना, भौतिक सुविधा, शिक्षकांचे परदेशातील प्रशिक्षण, गुणवत्ता विकास, अभ्यासक्रम विकास, पालक सहभाग विकास, व्यक्तीमत्व विकास, आनंददायी अभ्यासक्रम, देशभक्ती अभ्यासक्रम, मिशन बुनियाद,अध्यापन प्रक्रिया या आणि अशा अनोख्या गोष्टींविषयी सखोल असे मार्गदर्शन मिळाले.तसेच प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधून, निरीक्षण करुन विविध अभूतपूर्व अनूभुतीतून माहिती आणि मन परिवर्तन करणारे क्षण शिक्षकांना अनुभवयास मिळाले. डॉ. पांडे यांनी व तेथील शिक्षण उपसंचालक राजवीर सिंग यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य मनोज पांडे यांनी शाळेची यशोगाथा शिक्षकांना सांगितली. नील लोहिया यांनी पीपीटीद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षकांनी सर्व शिक्षकांना संपूर्ण शाळा, वर्ग, परिसर पाहणी करण्यास व संवाद साधण्यासाठी मदत केली. यानंतर दिल्ली डायट यांच्याकडून सर्व शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर विशेष दोन तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. यात शिक्षकांशी अनौपचारिक चर्चेसह शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर सर्वांना दिल्ली डायटकडून प्रशिक्षण घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. या दौर्‍यात नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जून कोळी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, राज्य संघटक नवनाथ अकोलकर, राज्य महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंके, ट्रस्ट सचिव शिवाजी राजीवडे, किशोर पाडवी, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब कबाडी, कोषाध्यक्ष अमोल बोठे, अशोक शेंडगे,दत्तात्रय डेंगळे,विकास तरटे, माया कांबळे,प्रिया सिंह,नंदा तांदळे,रेजा पायाळ, संतोष कारंडे, संग्राम गाढवे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

शिक्षक झाले नतमस्तक
सरकारी शाळेतील नेत्रदीपक भौतिक सुविधा, अवाक करणारी गुणवत्ता, शिक्षकांची प्रशिक्षणे व प्रोत्साहन, पालकांची सहभागी उपक्रमशीलता, सर्व स्तरावरील शिक्षणविषयक तळमळ व कृतिशीलता ही वैशिष्ट्ये भारावून टाकणारी होती. सरकारी शाळा अशा पण होऊ शकतात, असा आत्मविश्‍वास इतर राज्यांच्या सरकारांना, प्रशासनास देणारे संपूर्ण भारतासाठी आदर्शवत मॉडेल असणारे दिल्लीतील शिक्षण प्रशासन-सरकार-सरकारी शाळा पाहून शिक्षक नतमस्तक झाले.

COMMENTS