सामाजिक समांतर आरक्षणासंबधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासंदर्भात अभ्यास गट : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक समांतर आरक्षणासंबधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासंदर्भात अभ्यास गट : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. 28 : राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरतीसंदर्भातील अभ्या

काँगे्रसचा हिंदूंचे विभाजन करण्याचा डाव ;पंतप्रधान मोदींची टीका
सई लोकूर होणार आई, पतीसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
भाजप सत्ता आणि वाद

मुंबई दि. 28 : राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरतीसंदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितले.
शासकीय नोकरभरतीमध्ये आरक्षणबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, सामाजिक आणि समांतर आरक्षण संबंधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली 11 ऑगस्ट 2021 रोजी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये सुमंत भांगे, मनिषा कदम, गीत कुलकर्णी, सु.मो.महाजन आणि टि.वा. करपते यांचा समावेश आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयात सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कसे हे अभ्यासगट तपासणार आहे. या अभ्यासगटामार्फत सर्व माहिती एकत्रित करुन याबाबत पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. अभ्यासगटाची पहिली बैठक 12 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून अभ्यासगटामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS