स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली

अहमदनगर/प्रतिनिधी : स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीच्या सिमेंट फाउंडेशनवरील लोखंडी जाळीची चोरी झाली आहे. ही घटना नगर तालुक्यातील उदरमल येथे घडली. या ग

“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |
अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण
स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीच्या सिमेंट फाउंडेशनवरील लोखंडी जाळीची चोरी झाली आहे. ही घटना नगर तालुक्यातील उदरमल येथे घडली. या गावातील तळ्याच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या फाउंडेशनच्या दोन्ही बाजूची सहा हजार रुपये किमतीची लोखंडी जाळी कोणीतरी अज्ञात चोराने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेली. याप्रकरणी सरपंच योसेफ बाबुराव भिंगारदिवे (वय 65, राहणार उदरमल, तालुका नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. स्मशानभूमीतील ही लोखंडी जाळी तब्बल 150 किलोची आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कमेच्या चोर्‍यांबरोबरच वाहनचोरी, मंगळसूत्र चोरी या घटनेत वाढ होत असताना चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीकडे नजर वळवली आणि स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या फाऊंडेशनच्या दोन्ही बाजूच्या लोखंडी जाळीची चोरी केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS