मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असून, अजूनही हजारो कर्मचारी कामावर हजर झालेले नाही, याप्रकरणी परिवहनमंत्री अनिल परब यां
मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असून, अजूनही हजारो कर्मचारी कामावर हजर झालेले नाही, याप्रकरणी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचार्यांना इशारा दिला आहे. एसटी कर्मचार्यांनी कामांवर त्वरित हजर व्हावे, त्यांना दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर त्यांचेच नुकसान होणार आहे. तसेच कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली असून, ती अजून तीव्र करण्याचा इशारा परब यांनी दिला आहे. माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
एसटी कर्मचार्यांशी जसे दायित्व आमच्यावर आहे, तसेच जनतेचेही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे. फार ताणू नये. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यामुळे होणारे नुकसान कोणताही नेता भरून देणार नाही. कर्मचार्यांचे नुकसान स्वत:चे होईल, नेत्याचे होणार नाही. दोन महिने पगार नाही मिळाला तर त्यांचे नुकसान होईल. हे त्यांनी समजून घ्यावे. 41 टक्के पगार वाढ दिली आहे. ताणून धरू नका. एका शब्दावर आडून बसू नका. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. जनतेलाही उत्तर द्यायचं आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे कामावर या, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अध्यक्षाचे नियम बदलले आहेत. हात उंचावून मतदानाचा नियम पारित झाला आहे. हात वर करून किंवा आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे निवडणुकीला सरकार घाबरले असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मतदानात कुणाला किती मतदान मिळालं हे कळेलच. आम्ही राज्यपालांना फाईल पाठवली आहे. 28 डिसेंबरला निवडणूक घ्यायची आहे. आता बॉल राज्यपालांच्या कोर्टात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS