लोकशाहीपुढे हुकमशाहीचा टिकाव लागत नाही ; शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीपुढे हुकमशाहीचा टिकाव लागत नाही ; शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

पुणे : लोकशाहीमध्ये सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातात असते, त्यामुळे लोकशाहीमध्ये हुकूमशाही आणता येत नाही, अन्यथा लोकशाहीच्या रेटयापुढे हुकुमशाहीचा टिका

सीआरपीएफ जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबारात 3 ठार
जामखेड पोलिसांनी केली 48 हजाराची अवैध दारु जप्त
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

पुणे : लोकशाहीमध्ये सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातात असते, त्यामुळे लोकशाहीमध्ये हुकूमशाही आणता येत नाही, अन्यथा लोकशाहीच्या रेटयापुढे हुकुमशाहीचा टिकाव लागत नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली.
भारतात सध्याच्या सरकारने शेतकरी अडचणीत आणणारे कायदे आणले. त्यावर कोणत्याही सभागृहात किंवा शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा घडवून आणली नाही. परिणामी शेतकरी एकवटले. वर्षभर लढा दिला. अनेकाना प्राण गमवावे लागले. त्यानंतर 3 कायदे मागे घ्यावे लागण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली. अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली. खेड तालुक्याचे माजी आमदार साहेबराव तथा आप्पासाहेब सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, जीवनपट चित्रफीत प्रकाशन तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारीत नूतन इमारतीचे भूमिपूजन खासदार पवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले,देशातील शेतकर्‍यांची सध्याची अवस्था वाईट आहे. ही अवस्था बदलायची असेल तर त्याची आर्थिक गुंतवणूक क्षमता वाढवली पाहिजे. आपण कृषीमंत्री असतांना म्हणूनच 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. पुण्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातुन 1800 कोटी रुपये शून्य टक्के दराने दिले जातात. याकडे केंद्राने लक्ष द्यावे, असे पवार म्हणाले.

COMMENTS